एअरबस प्रकल्पावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...

एअरबस प्रकल्पावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Prithviraj Chavan News
Prithviraj Chavan Newssaam tv

शिवाजी काळे

Prithviraj Chavan News : राज्यातून वेदांता-फॉक्सफॉनपाठोपाठ आता टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. या एअरबस प्रकल्पावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Prithviraj Chavan News
भेटीगाठी आणि फोडाफोडी शिवाय मुख्यमंत्र्यांनी काहीही केलं नाही; AirBus प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,'गेल्या अनेक वर्षात राज्यात मोठा प्रकल्प नाही. हे दुर्दैव आहे. एअरबसबाबत प्रकल्प गुजरातला जाणार हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधान यांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात. पण आता मोदी जे करत आहेत. ते दुर्भाग्यपूर्ण आहे'.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्तक्षेप हा तीव्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राज्याची बाजू लंगडी पडत आहे. प्रकल्प देशात येतोय, याचं स्वागत केलं पाहिजे. पण यात पंतप्रधान किंवा जवळच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी एका राज्याच्या विरोधात हस्तक्षेप करण उचित नाही. याबाबत सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan News
Tata Airbus : सुभाष देसाईंच्या टक्केवारीमुळे महाराष्ट्रातून प्रकल्प गेला; भाजपचा गंभीर आरोप

माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातही राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. त्यावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले, 'शिंदे सरकारला विस्तार करता येत नाही. कुणाला काय आश्वासन दिली होती. त्यामुळे सरकार काम करू शकत नाही. त्यामुळे ओढाताण सुरू आहे. हे महाराष्ट्र राज्याची बदनामी आहे. सरकार किती दिवस चालेल याची काळजी सगळ्यांना आहे. पण अंतर्गत विरोध मूळ राज्याचे प्रश्न सुटत नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com