Rahul Gandhi: चित्यावरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका; ८ चिते आणले पण रोजगार...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे.
rahul gandhi and narendra modi
rahul gandhi and narendra modi saam tv

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये विशेष बंदोबस्तात सोडले. त्यानंतर यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे.

8 चित्ते आले, पण 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले नाही, असा आरोप देखील राहुल गांधींनी यावेळी केला.

rahul gandhi and narendra modi
Viral Video: पुण्यात भररस्त्यात दुचाकीने घेतला पेट; घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

राहुल गांधी यांचे ट्विट

8 चीते तो आ गए, अब ये बताइए, 8 सालों में 16 करोड़ रोज़गार क्यों नहीं आए? युवाओं की है ललकार, ले कर रहेंगे रोज़गार। असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा काल वाढदिवस आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नामिबियातून आणलेले आठ चित्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com