Budget 2023 : अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi news
Rahul Gandhi news SAAM TV

Rahul Gandhi News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी करसवलतीसह अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi news
Union Budget 2023: अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड, सेनसेक्समध्ये तेजी

''मित्र काल' अर्थसंकल्प अर्थसंकल्पात कोणत्याही नोकऱ्या निर्माण करण्याची दुरदृष्टी नाही. महगाईचा सामना करण्यासाठी कोणत्याही योजना नाहीत. विषमता दूर करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले, '१ टक्के लोक हे ४० टक्के संपत्तीचे मालक आहेत. तर ५० टक्के गरीब लोक हे ६४ टक्के जीएसटी भरतात. ४२ टक्के युवक बेरोजगार आहेत. पंतप्रधान यांना त्याबाबत काळजी नाही. मोदी सरकारला भारताच्या भविष्यासाठीचा विकासाचा रोडमॅप नाही'.

दरम्यान, काँग्रेसच्या (Congress) अन्य नेत्यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी देखील ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

'गेल्यावर्षी अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, शिक्षण, मनरेगा आणि अनुसूचित जातींच्या कल्याणाशी संबंधित तरतूदींना गौरवण्यात आले होते. यंदाच्या वर्षी सदर वास्तवर सर्वांना माहीत आहे. वास्तविक खर्च हा अर्थसंकल्पापेक्षा खूपच कमी आहे, असे म्हणत जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

गोरगरिबांचा बजेट वेगळं आहे का? - छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन कोटींवरून लाखांवर आणि आता हजारांवर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हे मिडल क्लासचं बजेट आहे. मग गोरगरिबांचा बजेट वेगळा आहे का? त्यांच्या कार्यशाळेत बजेट शिकायला जायला हवं, असं भुजबळ म्हणालेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com