हुकूमशहा जरा ऐका, अहंकाराचा पराभव होईल आणि....; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर घणाघात

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
Rahul gandhi and sanjay raut
Rahul gandhi and sanjay raut Saam Tv

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने अटक केलीय. ईडीने राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली असून मोदी सरकारविरोधात शिवसैनिक तोफ डागत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत ट्विटरवरुन विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्या विरोधात बोलेल त्याला परिणाम भोगावे लागतील. केंद्रीय यंत्रणांचा (central agencies) गैरवापर करुन विरोधकांचं खच्चीकरण करायचं आणि सत्य बोलणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. पंरतु, हुकूमशाह जरा ऐका, अहंकाराचा पराभव होईल आणि शेवटी सत्याचा विजय होईल, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे घणाघात केला आहे.

Rahul Gandhi tweet
Rahul Gandhi tweettwitter

संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ट्विटवरुन निशाणा साधला आहे. राहुल यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्या विरोधात बोलेल त्याला परिणाम भोगावे लागतील. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांचं खच्चीकरण करायचं आणि सत्य बोलणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. पंरतु हुकूमशाह जरा ऐका, अहंकाराचा पराभव होईल आणि शेवटी सत्याचा विजय होईल. राहुल गांधी यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Rahul gandhi and sanjay raut
राज्यात डबल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्कम पाठिंबा, CM एकनाथ शिंदे म्हणाले...

पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल मध्यरात्री अटक केली. त्यानंतर ईडीच्या विशेष न्यायालयाने राऊत यांना तीन दिवसांची ईडी कस्टडी ठोठावली आहे. त्यामुळे राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कस्टडीत राहावं लागणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली होती.

पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांवर करण्यात आला होता. राऊत (sanjay raut) ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विटरवर मोठी प्रतिक्रिया दिली होती. तुम्ही त्या व्यक्तीचा पराभव करु शकत नाही, जो कधी हार मानत नाही. झुकणार नाही, जय महाराष्ट्र, असं ट्विट करुन काल रविवारी राऊतांनी विरोधकांना सणसणीत इशारा दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com