Rahul Gandhi: 'मोदी घाबरलेत, संसदेत मला बोलूच देणार राहीत...' राहुल गांधींचा थेट हल्लाबोल, म्हणाले; 'हिम्मत असेल तर...'

Congress Press Conference: हिम्मत असेल तर राहुल गांधींच्या वक्तव्यावर संसदेत चर्चा करा, भाजपला थेट आव्हान..
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam TV

Rahul Gandhi Press Conference: कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये भारतीय लोकशाहीबाबत वक्तव्य केलं आणि भारतात मोठं रणकंदन सुरू झालं. विदेशी भूमीत आपल्या देशाचा अपमान झाल्याचा आरोप करत, राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी आग्रही भूमिका भाजपने घेतली आहे. त्याचवेळी परदेशातून भारतात परतलेल्या राहुल गांधींनी पहिल्यांदाच यावर भाष्य करत भाजपवर पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi
Devendra Fadnavis: माझ्या कुटुंबियांना गोवण्याचा प्रयत्न झाला, अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा

भारतात आल्यानंतर राहुल गांधींनींही यावर आक्रमक भूमिका घेत थेट पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मी जाताच एका मिनिटात सभागृहाचे कामकाज बंद झाल्याचे सांगत शक्यता कमी आहे पण उद्या तरी मला बोलण्यास देतील अशी आशा आहे, अशा शब्दात भाजपवर टीका केली.

काय म्हणाले राहुल गांधी..

"मी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदीजी (Naredra Modi) आणि अदानीजींबद्दल (Gatam Adani) जो प्रश्न विचारला होता, ते माझे भाषण हटवण्यात आले होते. मात्र मी ते भाषण मिळवले, त्यामध्ये असं काहीही नाही जे सार्वजनिक रित्या बोलू शकत नाही. मात्र सरकार अडानींना घाबरल्याने हा सगळा तमाशा सुरू आहे," अशा शब्दात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Rahul Gandhi
Cheetah Helicopter Crash : भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटसह दोघे बेपत्ता

तसेच पुढे बोलताना त्यांनी "मी संसदेत अडांनीसोबत काय संबंध आहेत, असा प्रश्न विचारला होता. मात्र त्याबद्दल काहीही उत्तरे मिळत नाहीत. एख खासदार म्हणून मी माझी भूमिका संसदेत मांडणार आहे, त्यामुळे मी आता जास्त खोलात जात नाही, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच लंडनमध्ये मी कोणतेही चुकीचे भाषण केले नाही, मला संधी दिल्यास संसदेत मी भूमिका मांडेन, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com