
नवी दिल्ली : रोजगाराच्या मुद्द्यावर अनेक प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या मोदी सरकारने आता या संकटावर मात करण्यासाठी योजना आखली. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख जणांना रोजगार दिला जाणार असल्याचं मोदी सरकारकडून (PM Narendra Modi) जाहीर करण्यात आलं. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मोदी सरकारच्या 10 लाख नोकऱ्यांच्या घोषणेवरुन टीका केली आहे. (Congress Leaders Rahul Gandhi Latest Marathi News)
राहुल गांधी यांनी ट्विट करत हे जुमला नाहीतर महाजुमला सरकार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना जुन्या आश्वासनाची देखील आठवण करुन दिली आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार 8 वर्षांपूर्वी सत्तेत आलं त्यावेळी दरवर्षी 2 कोटी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याप्रमाणं आता 10 लाख नोकऱ्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे. 'हे जुमला सरकार नाही तर महाजुमला सरकार' असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. (Rahul Gandhi Latest Marathi News)
कोरोना संकटात अनेकांच्या हातचं काम गेलं. अनेक जण बेरोजगार झाले. देशातील बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दोन वर्षात कुठलीही मोठी पदभरती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. हजारो रिक्त पदं केंद्र सरकारमध्ये असून ही पदभरती केव्हा केली जाणार, असा सवालही उपस्थित केला जात होता.
त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने योजना आखली. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख पदांची भरती करण्यात यावी, असे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबधित विभागांना दिले. मंगळवारी याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करून देण्यात आली आहे. पीएमओकडून करण्यात आलेल्या या घोषणेनं अनेकांच्या जीवात जीव आला आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलेल्यांसाठी येत्या काही दिवसांतच सुवर्णसंधी निर्माण होणार आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.