Congress: ​​गोव्यानंतर आता या राज्यात काँग्रेसला झटका; दोन दिग्गज नेत्यांनी दिला राजीनामा

गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
Congress
CongressSaam Tv

नवी दिल्ली: गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपच्या(BJP)संपर्कात असल्याची काल बातमी समोर आली होती. उत्तराखंडमध्येही काँग्रेस वाईट टप्प्यातून जात आहे. पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादाचे कारण देत दोन नेत्यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली आहे. कमलेश रमण आणि डॉ. आर.पी. रतुरी सोमवारी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत. डॉ.आर.पी.रातुरी हे गेल्या चार दशकांपासून डेहराडूनमध्ये काँग्रेससाठी काम करत आहेत. कमलेश रमण यांनी पक्षाच्या महिला शाखेची महानगराध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. या दोन्ही नेत्यांच्या जाण्याने उत्तराखंड काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.

Congress
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याच्या जवळचा; यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

आरपी रतुरी आणि कमलेश रमण यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पक्ष सोडण्याची घोषणा केली. प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष करण मेहरा यांच्यासाठी हा मोठा झटका असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होणार हे निश्चित आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाने राज्यातील नवीन प्रदेशाध्यक्षपदाची कमान करण मेहरा यांच्याकडे सोपवली. पक्षाने तरुण चेहरा म्हणून करण मेहरा यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मात्र राज्यात पक्षांतर्गत सुरू असलेल्या मतभेदांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Congress
संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे, त्यांना कुणीही गांभिर्याने घेत नाही, दरेकरांचा हल्लाबोल

गोव्यात काँग्रेसला मोठा झटका

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर आता गोव्यातील काँग्रेस आमदारांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नऊ आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसने मात्र या बातमीचे खंडन केले आहे. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. ९ आमदार भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसकडे (Congress) फक्त दोनच आमदार राहतील.

गोव्यात काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये (BJP) येतील या बातमीचे काँग्रेसच्या प्रभारींनी खंडन केले आहे. या सर्व बातम्या अफवा असल्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले. पणजीतील एका हॉटेलमध्ये पक्षाच्या ११ आमदारांसोबत शनिवारी झालेल्या बैठकीचा या अंदाजाशी काहीही संबंध नसल्याचेही काँग्रेस नेत्यांनी सांगितले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही बैठक झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com