Crime News : इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलात भेट; हनीट्रॅपमध्ये अडकला काँग्रेस नेत्याचा मुलगा

एका काँग्रेस नेत्याच्या मुलगा हनीट्रॅपमध्ये अडकला आहे.
Madhya Pradesh Crime
Madhya Pradesh Crime Saam TV

Madhya Pradesh Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशभरात हनीट्रंपच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज नवनवीन घटना समोर येत आहेत. उच्चभ्रू व्यक्तींना आपल्या जाळ्यात अडकून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात आहे. मध्य प्रदेशातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका काँग्रेस नेत्याच्या मुलगा हनीट्रॅपमध्ये अडकला आहे. (Latest Marathi News)

Madhya Pradesh Crime
Crime News : धावत्या रेल्वेत ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; टीसीसह एकाला अटक

एका मॉडेल तरुणीने त्याला हनीट्रँपमध्ये अडकून त्याच्याकडून जवळपास १२ लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी प्रकरणी विजय नगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणीविरोधात ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस (Police) या तरुणींसह तिच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

काँग्रेस नेत्याच्या मुलाची इन्स्टाग्रामवर (Instagram) एका तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर तरुणीने त्याला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तरुणी ज्या रुममध्ये थांबली होती, तिथे तिच्या अन्य साथीदारांनी गुप्त पद्धतीने कॅमेरे बसवून ठेवले होते.

तरुणीचे सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदा पाहून काँग्रेस नेत्याच्या मुलाने आपल्या भावनावरील संयम गमावला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा काँग्रेस नेत्याचा मुलगा या तरुणीसोबत शारीरिक (Relation) संबंध ठेवत होते, तेव्हा हा प्रकार सदरील तरुणीचे अन्य साथीदार छुप्या कॅमेऱ्यातून कैद करीत होते.

Madhya Pradesh Crime
Viral News : १६ वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं शिक्षिकेचं प्रेम; नंतर जे घडलं ते चक्रावून टाकणारं

दरम्यान, काही दिवसांनी तरुणीने तिच्या सहकाऱ्याच्या मदतीने काँग्रेस नेत्याच्या मुलाला जाळ्यात अडकवले आणि त्याच्याकडून लाखोंची रक्कम उकळली. मात्र तरुणी वारंवार पैशाची मागणी करत असल्याने अखेर काँग्रेस नेत्याच्या मुलाने थेट पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली.

याबाबत विजयनगर पोलिसांनी सांगितले, उज्जैनमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक दिवंगद टीकाराम टाटावत यांचा मुलगा महेश टाटावत याला एका तरुणीने हनीट्रॅपमध्ये अडकवलं आहे. महेश याची ४ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने त्याला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि फसवणूक करून व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com