...यात्रा पर निकला है हमारा शेर; चित्ता प्रोजेक्टवरून काँग्रेसचा PM मोदींवर निशाणा

चिता प्रोजेक्टवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Congress Leaders Took jibe on PM Narendra Modi Over Cheetah Project /Twitter
Congress Leaders Took jibe on PM Narendra Modi Over Cheetah Project /Twittersaam tv

Congress Leaders Took jibe on PM Narendra Modi | नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात नामीबियातून आणलेल्या चित्त्यांना सोडलं. यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

भारत जोडो (Congress Bharat Jodo Yatra) यात्रेवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा सगळा खेळ चालवला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत ट्विट केलं आहे. चिता प्रोजेक्टसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी उल्लेख देखील केला नाही. पीएम मोदी (PM Modi) विनाकारण गाजावाजा करत आहेत. राष्ट्रीय मुद्दे आणि भारत जोडो यात्रेवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, असं रमेश म्हणाले.

जयराम रमेश म्हणाले की, चिता प्रोजेक्टसाठी २५ एप्रिल २०१० मध्ये केपटाउनमध्ये दौरा केला होता. त्याचा उल्लेखही न होणे हे ताजे उदाहरण आहे. आज पंतप्रधान उगाचच गाजावाजा करत आहेत. हा राष्ट्रीय मुद्दे आणि भारत जोडो यात्रेवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.

Congress Leaders Took jibe on PM Narendra Modi Over Cheetah Project /Twitter
Kuno National Park : कुनो राष्ट्रीय अभयारण्य कोठे आहे ? पंतप्रधानांनी आणलेले नाबियातील 'आठ' चित्ते येथे का ठेवण्यात येतील ?

२००९ - ११ या दरम्यान जेव्हा वाघांना पहिल्यांदाच पन्ना आणि सरिस्कामध्ये हलवण्यात आले, तेव्हा काही लोक शंका उपस्थित करत होते. ते सगळे चुकीचे ठरले. चिता प्रोजेक्टवरही अशाच प्रकारची भविष्यवाणी केली जात आहे. मी या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देतो, असे जयराम रमेश म्हणाले.

काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनीही टोलेबाजी केली आहे. त्यांनी जयराम रमेश यांचे ट्विट रिट्विट केले. आमचा वाघ यावेळी देश जोडण्यासाठी निघाला आहे. देश तोडणारे विदेशातून चित्ते आणत आहेत, असे ते म्हणाले.

Congress Leaders Took jibe on PM Narendra Modi Over Cheetah Project /Twitter
७० वर्षांनी चित्ते भारतात आले, पंतप्रधान मोदी भाषणात काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर

कुनो अभयारण्यात सोडले चित्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नामीबियातून आणलेले आठ चित्ते कुनो अभयारण्यात सोडले. नरेंद्र मोदी यांनी स्वतः चित्त्यांचे फोटो काढले. यावेळी मोदी म्हणाले की, आपण 1952 मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले होते, परंतु अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, हे दुर्दैव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com