Video: कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने रस्ते बनवणार; काँग्रेस आमदाराचं विधान

जामतारामधील रस्ते असे बनवले जातील की लोकांना ना धूळीचा सामना करावा लागेल, ना खड्ड्यांचा असे काँग्रेसचे आमदार डॉ. इरफान अन्सारी यांनी सांगितले.
Dr Irfan Ansari & Kangana Ranaut
Dr Irfan Ansari & Kangana RanautSaam TV

झारखंड मधील जामताडाचे काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी यांनी अभिनेत्री कंगना राणावतबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इरफान अन्सारी (Dr Irfan Ansari) यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की ''जामाताडा मधील रस्ते हे कंगनाच्या गालापेक्षाही मऊ होतील. आणि त्या रस्त्याचा वापर आदिवासी मुलं आणि राज्यातील युवा वर्ग करेल''. पुढे ते म्हणाले की अशा १४ जागतीक दर्जाचे रस्त्यांचे आगामी काळात सुरु होईल. (Dr Irfan Ansari Viral Video)

जामतारामधील रस्ते असे बनवले जातील की लोकांना ना धूळीचा सामना करावा लागेल, ना खड्ड्यांचा असे काँग्रेसचे आमदार डॉ. इरफान अन्सारी यांनी सांगितले. दरम्यान आमदार इरफान अन्सारी हे पेश्याने डॉक्टर आहेत, तरी अशी वादग्रस्त विधाने करणे त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. काही दिवसांपुर्वी त्यांनी नागरिकांनी जास्त वेळ मास्क लावू नये असे आवाहन देखील केले होते.

डॉ. इरफान अन्सारी यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही पाहाल की भाजपच्या काळात असे रस्ते कधी बनले नसतील असे मी बनवून दाखवणार आहे. भाजपाने राज्याला लुटण्याचं काम केले आहे. रस्ते न बनवल्यामुळे आज आदिवासी लोकांना धुळीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. यामुळे मी ठरवले आहे की आमचं सरकार जेव्हा बनेल तेव्हा स्थानीकांसाठी आम्ही विकास करणार आहोत. त्याच अनुषंगाने मी हेमंत सोरेन यांच्याकडून 14 रस्ते मंजूर केले आहेत त्याचे काम लवकरच सुरु होईल असे इरफान अंसारी यांनी सांगितले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी आरजेडी सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनीही अनेक वर्षांपूर्वी बिहारच्या रस्त्यांना बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवण्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्या या विधानावरुन बराच वाद झाला होता. आता या विधानावरून इरफान अन्सारी यांच्याही वादाला सामोरे जावे लागू शकते.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com