काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या

घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये विभूने लिहिलं आहे की, माझे आई, वडिल, भाऊ सगळे चांगले आहेत. मला त्यांचा काही त्रास नाही. मी माझ्या मित्रांकडे आत्महत्या करत आहे.
काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या
काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्याSaam Tv

जबलपूर - मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये jabalpur एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस Congress आमदाराच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. काँग्रेस आमदार संजय यादव यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विभू यादव असे या मुलाचे नाव आहे. त्याने पिस्तूलातुन स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विभूने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये विभूने लिहिलं आहे की, माझे आई, वडिल, भाऊ सगळे चांगले आहेत. मला त्यांचा काही त्रास नाही. मी माझ्या मित्रांकडे आत्महत्या करत आहे. बरगी मतदारसंघातील आमदार संजय यादव यांच्या मुलाने विभूने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.

काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या
Video: मुंबईत पुन्हा अग्नितांडव; मानखुर्दमध्ये गोदामांना भीषण आग

गोळीच्या आवाजाने घरातले जेव्हा विभूच्या खोलीकडे आले तेव्हा विभू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आत्महत्येची माहिती मिळताच एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येआधी विभूने त्याच्या काही मित्रांना मेसेज पाठवले होते. त्यात लिहिलं होतं की, 'तुम्ही सर्वजण चांगले आहात. स्वत:ची काळजी घ्या.' विभू हा मानसशास्त्राचा विद्यार्थी होता. तो पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तयारी करत होता. विभूच्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com