
Congress nationwide Protest against unemployment and inflation नवी दिल्ली: महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस कमालीचा आक्रमक झाला आहे. काँग्रेसने महाराष्ट्रासह नवी दिल्लीत आंदोलने केली. नवी दिल्लीत काँग्रेसने संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाचे ठिकठिकाणी नेतृत्व केले.
नवी दिल्लीतील (New Delhi) काँग्रेसच्या आंदोलनात (Congress Protest) राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील सहभागी झाले होते. पक्षाच्या सर्व नेत्यांनी काळे कपडे परिधान करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विनापरवानगी आंदोलन केल्याच्या आरोपांखाली दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं.
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. आम्ही शांततेने राष्ट्रपती भवनवर जात होतो. या रॅलीत सर्व जण हे राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार आहेत. मात्र, आम्हाला राष्ट्रपती भवनावर जाण्यापासून रोखले जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून आम्ही आंदोलन केले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. काही खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना मारहाण केली आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
भारतीय लोकशाही सुरक्षित राहावी हे आमचे काम आहे. जनतेच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे आमचे काम आहे आणि आम्ही ते करत आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले.
मुंबईसह महाराष्ट्रातही आंदोलन, काँग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात
महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर मुंबईसह महाराष्ट्रातही काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई आणि राज्यातील विविध भागात काँग्रेस नेत्यांनी आंदोलने केली. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.