Congress presidential elections : अशोक गहलोत कांग्रेसचे अध्यक्ष होणार ? चर्चांना उधाण

अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
ashok Gehlot
ashok Gehlot saam tv

शिवाजी काळे

Congress presidential elections News : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेस (Congress) अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अशोक गेहलोत हे अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ashok Gehlot
ED, CBI च्या कारवायांमागे पंतप्रधानांचा हात नाही पण..., मोदींचा बचाव करताना ममता बॅनर्जींचा भाजपवर घणाघात

गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सचिन पायलट यांना देण्यात येऊ शकतं. पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पायलट यांच्याऐवजी गेहलोत यांच्या निकटवर्तीयाला मुख्यमंत्री करण्यात यावं, अशी गेहलोत यांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी रात्री १० वाजता राजस्थानच्या काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

अशोक गेहलोत हे राजस्थानची काँग्रेस आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर दिल्लीत बुधवारी सकाळी १० वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर अशोक गेहलोत हे केरळमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. तर राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट हे आधीपासूनच भारत जोडो यात्रेत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला हा राहुल गांधी हे केरळमधील यात्रेतच घेणार का ? अशीही चर्चा सुरू आहे. तर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय राहुल गांधी किंवा सोनिया गांधी देखील घेऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

ashok Gehlot
Eknath Shinde | 'धनुष्यबाण' मिळविण्यासाठी शिंदें गटाची नवी रणनीती; उद्धव ठाकरेंना धक्का बसणार?

कधी होणार निवडणूक?

निवडणुकीची अधिसूचना - २२ सप्टेंबर

उमेदवारी अर्ज भरणे - २४ ते ३० सप्टेंबर

अर्जांची छाननी - १ ऑक्टोबर

अर्ज माघारी घेण्याची मुदत - ८ ऑक्टोबर

मतदान - १७ ऑक्टोबर

मतमोजणी - १९ ऑक्टोबर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com