काँग्रेसचं पुन्हा 'चिंतन'; सर्व राज्यांचे मंत्री आणि नेत्यांना बैठकीला बोलावणार

कॉंग्रेसकडून बैठकीसाठी सर्व राज्यांचे मंत्री, कार्यकारी अध्यक्ष आणि प्रवक्त्यांना निमंत्रण दिले जाणार आहे.
काँग्रेसचं पुन्हा 'चिंतन'; सर्व राज्यांचे मंत्री आणि नेत्यांना बैठकीला बोलावणार
Sonia Gandhisaam tv

नवी दिल्ली : उदयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं तीन दिवसीय चिंतन शिबिर (Chintan Shivir) नुकतंच पार पडलं. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा (Sonia Gandhi) सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या चिंतन शिबिरामध्ये देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते. राजकीय, सामाजिक न्याय आणि विकास, अर्थव्यवस्था, संघटन, शेतकरी आणि कृषी,तरुण आणि रोजगार अशा विषयांवर या चिंतन शिबिरात चर्चा करण्यात आली. दरम्यान, कॉंग्रसचे जे नेते या चिंतन शिबिराला उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी आता कॉंग्रेसने (congress) पुन्हा बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसकडून या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मंत्री, कार्यकारी अध्यक्ष आणि प्रवक्त्यांना निमंत्रण दिले जाणार आहे.

Sonia Gandhi
भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था; UNच्या रिपोर्टमध्ये दावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेस पक्षाकडून या एकदिवसीय बैठकीचे आयोजन जून महिन्यात करण्यात येणार आहे. चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी यांचा सहभाग असणार आहे. यावेळी सर्वा नेत्यांशी विचारणा करुन विविध विषयांवर खलबलं होणार आहेत. या बैठकीला तब्बल १२० नेतेमंडळी सहभाग दर्शवणार असून त्यामध्ये राज्यमंत्री, कार्यकारी अध्यक्ष आणि प्रवक्त्यांचा समावेश असणार आहे. चिंतन शिबिरात यापूर्वी सहभागी झालेले कार्यकर्ते जितके महत्वाचे आहेत, तितकचं महत्व या बैठकील उपस्थित नसलेल्या नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आहे. असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

माझ्या सर्व सहकाऱ्यांना चिंतन शिबिरात येण्याची इच्छा होती. याची मला कल्पना होती. पण खूप साऱ्या कारणांमुळं मोजक्याच नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले. ते परिस्थिती समजून घेतील याची मला खात्री आहे. चिंतन शिबिरात सहभाग जरी घेतला नसला तरी माझ्या कार्यकर्त्यांचे महत्व कमी होत नाही.असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसंच चिंतन शिबिर झाल्यानंतर महात्मा गांधी जयंतीनिमित्त कॉंग्रेस २ ऑक्टोबरला 'भारत जोडो' पदयात्रा सुरु करणार आहे. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, गांधी जयंतीनंतर कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा यावर्षी लॉंच करण्यात येणार आहे.यामध्ये कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. या यात्रेत सामजिक एकोपा वाढवण्याचा दृष्टीकोन असणार आहे. तसंच देशातील कोट्यावधी जनतेच्या समस्यांबाबतही चर्चा केली जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com