परीक्षाही ३ तासांची, राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे NSUI आक्रमक; कार्यकर्ते थेट टाकीवर चढले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडी चौकशी सुरू आहे.
NSUI Workers Protest Against ED, Rahul Gandhi News
NSUI Workers Protest Against ED, Rahul Gandhi NewsSaam Tv

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून 'नॅशनल हरॉल्ड' प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. या चौकशीविरोधात काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. काल एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन करत ईडीचा (ED) निषेध केला. काल बुधवारी एनएसयुआयच्या दोन कार्यकर्त्यांनी दिल्लीतील कलावती रुग्णालयाजवळ असणाऱ्या एका पाण्याच्या टाकीवर सलग ६ तास चढून निषेध केला. (NSUI Workers Protest Against ED)

NSUI Workers Protest Against ED, Rahul Gandhi News
देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत आढळले 12 हजारांहून अधिक रुग्ण, 11 मृत्यू

हे दोनही कार्यकर्ते एनएसयुआयचे आहे. यातील एक एनएसयुआयचे (NSUI) राष्ट्रीय सचिव विनोद जाखड आणि दिल्ली विद्याापीठातील दुसऱ्या वर्षातील निरज रॉय अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेवर पोलिसांनी (Police) अजुनही प्रतिक्रीया दिलेली नाही. 'हे दोन्ही कार्यकर्ते सायंकाळी ४ वाजता पाण्याच्या टाकीवर चढले, आणि कित्येक तास ते टाकीवरच होते. या दोघांना राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी समजावले तेव्हा ते खाली आले' अशी माहिती एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव नितीश गौड यांनी दिली.

NSUI Workers Protest Against ED, Rahul Gandhi News
वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान मोदींकडून आईला मोठं गिप्ट; रस्त्याला देणार हिराबेन यांचं नाव!

देशात सुरक्षित वाटत नाही

देशात सुरक्षित वाटत नाही, म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. एखादी परीक्षा तीन तासात संपते, पण राहुल गांधी यांची चौकशी ६ तास चौकशी करत आहे, ही कसली चौकशी आहे.' असंही गौड म्हणाले. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली. शुक्रवारी पुन्हा राहुल गांधी यांना ईडीने चौखशीसाठी बोलावले आहे.

'नॅशनल हेराल्ड' या वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे राहुल गांधी यांची बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ईडीने चौकशी केली. यावर काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रतिक्रीया दिली. बुधवारी नवी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी प्रतिक्रीया देत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com