New Delhi: काँग्रेस सेवा दलास मुख्यालय सोडावे लागणार

काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य लोकांपर्यंत नेणारी, पक्षाची ताकद वाढविणारी संघटना असलेल्या सेवा दलास आता मुख्यालय सोडावे लागणार आहे
New Delhi: काँग्रेस सेवा दलास मुख्यालय सोडावे लागणार
New Delhi: काँग्रेस सेवा दलास मुख्यालय सोडावे लागणार- Saam TV

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य लोकांपर्यंत नेणारी, पक्षाची ताकद वाढविणारी संघटना असलेल्या सेवा दलास आता मुख्यालय सोडावे लागणार आहे. राजधानी दिल्लीत २६, अकबर रोड हे अनेक दशकांपासून काँग्रेस सेवा दलाचे मुख्यालय आहे. मात्र मंगळवारी संपदा संचालनालयाने दिलेल्या सूचनेनंतर त्यांना ते लवकरच आपले कार्यालय रिकामे करावे लागणार आहे. (Congress Seva Dal will vacate Headquarters)

काँग्रेसला (Congress) दीनदयाळ उपाध्याय मार्गावर पर्यायावर जागा देण्यात आली. तेथे काँग्रेस मुख्यालयाचे बांधकाम सुरू आहे. सेवा दलाला २६, अकबर रोड रिकामे करण्याच्या अनेक नोटिसा मिळाल्या. प्रत्येक वेळी मुदतवाढीचा विनंती केल्यावर ती वाढवण्यात आली आहे. यावेळी संपदा संचालनालयाने काँग्रेस सेवादलाला अंतिम नोटीस बजावली आहे.

New Delhi: काँग्रेस सेवा दलास मुख्यालय सोडावे लागणार
Raut Vs Somaiya: माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक व्हायला हवं होतं - संजय राऊत

सेवा दलाला कार्यालय कोरोनाच्या (Corona) आधी रिकामे होणार होते. कोरोनामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता संपदा संचालनालयाकडून आदेश मिळाल्यानंतर काँग्रेसने सेवादल ५, रायसीना मार्गावर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तेथे एनएसयूआय आणि भारतीय युवक काँग्रेसचे कार्यालय आहे. सध्या लुटियन्स झोनमध्ये काँग्रेसला तीन बंगले देण्यात आले आहेत.

त्यापैकी २४, अकबर रोड येथील काँग्रेसचे मुख्यालय आहे. २६, अकबर रोड ही वास्तू काँग्रेस सेवादलाला देण्यात आली आहे. ५, रायसीना मार्गावरील बंगला काँग्रेस युवक आणि एनएसयूआयला देण्यात आला आहे. सध्या दीनदयाल उपाध्याय मार्गावरील काँग्रेस मुख्यालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या वर्षअखेरीस काँग्रेसची सर्व कार्यालये तेथे स्थलांतरित होण्याची शक्यता काँग्रेसमधील सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com