CWC Meeting: वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या हाती लागलं मोदींना पराभूत करण्याचं शस्त्रं; भाजपचा पराभव निश्चित

Congress Working committee: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलीय.
Congress Working committee Meeting
Congress Working committee Meetingsaam Tv

Congress Working committee Meeting 2023:

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. आज काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली. या बैटकीत काँग्रेसच्या हाती भाजप आणि मोदींना पराभूत करण्याचं शस्त्र लागलंय. 'इंडिया' आघाडी बनल्यानंतर काँग्रेसनं जातीय समीकरण जोडणं सुरू केलंय. (Latest Politics News )

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर हैदराबाद येथे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत जातीनिहाय जनगणनेसह दलित,आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली गेली. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि ओबीसीसाठी असलेल्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावे. यावर बोलताना काँग्रेस माडिया प्रमुख पवन खेडा म्हणाले की, राहुल गांधींनी कर्नाटकमधील कोलारच्या सभेत जातीवर आधारित जनगणना केली जावी याची मागणी केली होती. यामुळे सर्व जातीमधील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळेल.

ज्या राज्यात काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर होते त्या राज्यातील अल्पसंख्याक जातीमधील मतदार काँग्रेसच्या पाठिशी आहेत. दलित आणि आदिवासीही काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष हेदेखील दलित समाजातून येतात. जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मागणीतून काँग्रेस ओबीसी मतदारांना आकर्षित करत आहे.

दरम्यान ओबीसी समाजावर भाजपची पकड आहे. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांसह आरक्षण कार्ड टाकलं तर भाजपला पराभूत करता येईल, असं काँग्रेस नेत्यांना वाटतं. त्याचबरोबर केंद्र सरकारनं बोलवलेल्या विशेष सत्रात महिला आरक्षण विधेयक पारित करण्यात, यावे अशी मागणी देखील काँग्रेसच्या या बैठकीत करण्यात आलीय. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस भाजपला घेरणार आहे.

Congress Working committee Meeting
Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: 'खोटं बोला पण रेटून बोला...'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com