Money Laundering Case : नोरा फतेही रडारवर, तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत.
Nora Fatehi
Nora Fatehi saam TV

मुंबई : मनी लॉण्डरिंगमध्ये अटक केलेल्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची इडीने बुधवारी चौकशी केली. त्यानंतर आज १५ सप्टेंबरला EOW ने अभिनेत्री नोरा फतेहीची कसून चौकशी केली. या प्रकरणातील महत्वाची सूत्रधार पिंकी ईरानी नोरासोबत चौकशीदरम्यान हजर होती. (Constitution of Economic Offence Wing investigates nora fatehi)

Nora Fatehi
Daler Mehndi Case : गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा; कोर्टाकडून तुरूंगवासाच्या शिक्षेला स्थगिती

ईडीने केलेल्या तपासानंतर तसेच महत्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर नोरा फतेहीला महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले. एका इव्हेंटबद्दल नोराची चौकशी करण्यात आली. २०२२ मध्ये नोरा या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. हा इव्हेंट चेन्नईत झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सुकेशसोबत केलेल्या चॅटिंगबद्दल नोराची विचारपूस केली होती.

नोराने पोलिसांना काय सांगितलं ?

इव्हेंटचं आयोजन एलएस कॉर्पोरेशन आणि नेल आर्टिस्ट्री (लीना मारीया) ने केला होता. डिसेंबर २०२० मध्ये या इव्हेंटचं आयोजन चेन्नईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. तपास सुरु असताना नोराने जबाब दिला की, इव्हेंट चांगला होता. लीना मला भेटली होती. तिने मला गूचीची बॅग आणि आयफोन दिला होता. माझे पती तुमचे मोठे चाहते आहेत, असं लीनाने मला सांगितलं. पण आता तु्म्हाला भेटू नाही शकत. तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोला. तिने फोन स्पीकरवर ठेवला होता. त्यांनी (शेखर) ने माझे आभार मानले. आम्ही दोघेही तुमचे चाहते असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर लीनाने माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी बीएमडब्लू कार गिफ्ट करणार असल्याचं सांगितलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com