"ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नाही, मात्र अयोध्येत मंदिराच्या जागी मशीद आहे"

'अयोध्येत राम मंदिराचे निर्माण होत आहे, पण तिथे एक मशीद होती. मी आजही म्हणतो की, तिथे मशीद आहे.'
Gyanvapi Mosque
Gyanvapi MosqueSaam TV

लखनौ : उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी रविवारी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi Masjid) बोलत असताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "आमची ज्ञानवापी मशीद हिसकाऊन घेऊ शकणार नाही. मशिदीसाठी जीव द्यावा लागला, तरीदेखील आम्ही देऊ" असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

रविवार पत्रकारांशी बोलत असताना शफीकुर्रहमान बर्क यांनी हे वक्तव्य केलं ते पुढं म्हणाले, वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत कसलेही 'शिवलिंग' नाही. मशिदीमध्ये शिवलिंग असल्याची परिस्थिती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) तयार केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसंच ज्ञानवापी मशीद कोणी कुणीच आमची मशीद हिसकाऊन घेऊ शकणार नाही. मशिदीसाठी जीव द्यावा लागला, तरीदेखील आम्ही देऊ, अखेरच्या श्वासापर्यंत ज्ञानवापी सोडणार नाहीत. मुस्लिमांकडून ज्ञानवापी कोणी घेऊ शकत नाही. असं ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) बांधलं जात असलं तरी तिथं मशीद असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

हे देखील पाहा -

बर्क म्हणाले, "अयोध्येत राम मंदिराचे निर्माण होत आहे, पण तिथे एक मशीद होती. मी आजही म्हणतो की, तिथे मशीद आहे. फक्त शक्तीच्या आणि सत्तेच्या जोरावर मशिदीच्या ठिकाणी मंदिर उभारलं जात आहे. मुस्लिमांवर हल्ले केले जात आहेत, मशिदी पाडल्या जात आहेत. सरकारने कायद्याचे पाल करावे. आजची परिस्थिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार केली जात आहे. तुम्ही इतिहास पाहिला तर, तुम्हाला कळेल की, ज्ञानवापीमध्ये कुठलेच शिवलिंग नाही. हे सर्व खोटं आहे.'

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com