लसीच्या 2 डोसमधील अंतर परत बदलणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

2 ते 4 आठवड्यांतच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
लसीच्या 2 डोसमधील अंतर परत बदलणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
लसीच्या 2 डोसमधील अंतर परत बदलणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय Saam Tv

नवी दिल्ली : देशामध्ये जास्तीत जास्त कोरोना Corona लसीकरण Vaccination करण्याकरिता अधिक प्रयत्न सुरू आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. यातच आता कोरोना लसीकरणात मोठा बदल करण्यात येणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत सरकारने government आणखी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या २ डोस मधील अंतराबाबत राहणार आहे.

सध्या देशाअधे पुण्याच्या Pune सीरम इन्स्टिट्यूट Serum Institute आणि ऑक्सफोर्डची Oxford कोविशिल्ड हैदराबादच्या Hyderabad भारत India बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक V. या ३ लसींचे २ डोस घेणे बंधनकारक केले आहे. त्या २ डोसमध्ये विशिष्ट अंतर ठेवण्यात आलेला होता. १ डोस घेल्यानंतर या विशिष्ट कालावधीनंतर २ डोस घेता येणार होतो. कोविशिल्डच्या २ डोस मधील अंतर सध्यातरी १२ ते १८ आठवडे करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

पण ते आता परत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार आता कोविशिल्ड कोरोना लसीच्या २ डोस मधील अंतर कमी करण्याच्या तयारीत आहे. पण हे अंतर फक्त ४५ आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी असणार आहे. याबाबत २ ते ४ आठवड्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे कोव्हिड-१९ वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितल्याचे वृत्त द मिंटने याबाबत दिले आहे.

कोरोना लसीकरण सुरू झाले. त्यावेळेस कोविशिल्डच्या २ डोस मधील अंंतर ४ ते ६ आठवडे करण्यात आले होते. यानंतर ते वाढवून ४ ते ८ आठवडे आणि परत १२ ते १६ आठवडे करण्यात आले होते. हे अंतर वाढवण्यावरून वादही देखील झाला होता. लसीकरणाबाबत सरकारची जी भूमिका होती.त्यावर मोठया प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.

लसीच्या 2 डोसमधील अंतर परत बदलणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
GOOD NEWS! ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला सुरूवात, DGCIची सीरम इन्स्टिट्यूलाही परवानगी

पण आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा तज्ज्ञांनी यावेळी केला आहे. या लशीच्या २ डोस मधील अंतर जास्त असल्यास शरीरामध्ये जास्त अँटिबॉडीज तयार होत असतात, असे या संशोधनामधून दिसून आले होते. लसीचे चांगले परिणाम मिळावेत म्हणून यासाठी भारतामध्ये २ डोस मधील अंतर वाढवण्यात आले होते.

जूनमध्ये जेव्हा भारतात २ डोस मधील अंतर वाढवले गेले. तेव्हापासून १ डोसमुळे जास्त अँटिबॉडी दिसून आल्या आणि त्यानंतर त्या घटत गेल्याचे दिसून आले आहे. २ डोस मधील अंतर घटल्यावर असे अनेक देशांमध्ये दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते, लसीकरणाची स्थिती बदलणार आहे आणि नव्या अभ्यानुसार यामध्ये बदल देखील करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com