Corona Cases India : झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने टेन्शन वाढवलं; अशी आहे देशातील सद्यस्थिती

देशातील कोरोनाबाधितांची सक्रिय संख्या 1,19,457 वर पोहोचली
Corona Update, Covid19 In India, Covid Latest News, Corona Cases India Today, Covid19 Virus
Corona Update, Covid19 In India, Covid Latest News, Corona Cases India Today, Covid19 Virus Saam TV

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची (Corona) प्रकरणे सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 18 हजार 930 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 35 जणांचा मृत्यू झाला. बुधवारच्या तुलनेत आज सुमारे अडीच हजार अधिक प्रकरणे (Corona Cases) समोर आली आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,19,457 वर पोहोचली आहे. तर दैनंदिन सकारात्मकता दर आता 4.32% टक्क्यांवर पोहोचला आहे. (Corona Cases India Today)

Corona Update, Covid19 In India, Covid Latest News, Corona Cases India Today, Covid19 Virus
मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप ठरलं; गृह, महसूल खातं कुणाकडे? वाचा सविस्तर...

देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात दिवसागणिक 3 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी महाराष्ट्रात 3142 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. यातील मुंबईत 695 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 19981 वर पोहोचली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे 358 नवीन रुग्ण आढळल्यानंतर येथील बाधितांची संख्या 7,30,427 वर पोहोचली आहे. (Corona Cases In Maharastra)

Corona Update, Covid19 In India, Covid Latest News, Corona Cases India Today, Covid19 Virus
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले; पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचा भाव

तामिळनाडूची स्थितीही चिंताजनक

महाराष्ट्रपाठोपाठ तामिळनाडूमध्येही कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 2,743 नवीन रुग्ण आढळले आहेत. मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत 1,791 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. राजधानी चेन्नईमध्ये 1,062 नवीन रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीत 600 प्रकरणं

दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 600 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि महामारीमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला तर संसर्ग दर 3.27 टक्क्यांवर आला. दिल्लीत एकूण संसर्गाची संख्या 19,38,648 वर पोहोचली असून मृतांची संख्या 26,276 वर पोहोचली आहे. मंगळवारी संसर्गाची 615 प्रकरणे नोंदवली गेली, तर तीन जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,590 आहे. (Corona Cases Delhi Update)

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com