धक्कादायक : कोरोना काळात साचलेला कचरा, जगासाठी ठरु शकतो नव्या संकटाचं कारण

या 80 लाख टन कचऱ्यापैकी 25 हजार टन कचरा (plastic waste) महासागरांमध्ये गेला असल्याचं नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जर्नलच्या अहवालामध्ये सांगितलं आहे.
धक्कादायक : कोरोना काळात साचलेला कचरा, जगासाठी ठरु शकतो नव्या संकटाचं कारण
धक्कादायक : कोरोना काळात साचलेला कचरा, जगासाठी ठरु शकतो नव्या संकटाचं कारणSaamTV

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या (Corona epidemic) काळात लोकांनी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उपाययोजना केल्या होत्या सुरावातीच्या काळात जगातील सर्वच नागरिकांनी कोरोनाचा एवढा धसका घेतला होता की प्रत्येकाने सांगितलेले सुरक्षेचे मार्ग अवलंबीत होते. मात्र या सगळ्यामध्ये सर्वानुमतीने आणि प्रामुख्याने वापरण्यात आलेल्या उपाययोजना म्हणाजे मास्क आणि त्या पाठोपाठ पीपीई किट प्लास्टिक ग्लोव्हज् (PPE Kit Plastic Gloves) आणि फेसशिल्ड इत्यादी. मात्र या सर्वांच्या उत्पादनासाठी प्लास्टिकचा वापर (Use of plastic) मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तसेच दवाखान्यांमध्ये लहान लहान लहान स्वरुपात वापरात येणारं प्लास्टिक वेगळच आणि या सर्व प्लास्टिक वापरामुळेच जगभरात कोरोना काळात जवळपास 80 लाख टन प्लास्टिक कचरा (80 million tons of plastic waste) तयार झाला असल्याच संशोधन चीनमधलं नानजिंग विद्यापीठ आणि अमेरिकेतल्या सॅन दिएगोमधलं कॅलिफोर्निया विद्यापीठ (University of California) यांनी केलं आहे. (80 million tons of plastic waste)

हे देखील पहा -

दरम्यान या 80 लाख टन पैकी 25 हजार टन कचरा (plastic waste) महासागरांमध्ये गेला असल्याचं नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जर्नलच्या अहवालामध्ये सांगितलं आहे. समुद्रामध्ये जमा होणारा प्लास्टिकचा कचरा आगामी 3 ते 4 वर्षांमध्ये लाटांद्वारे पुन्हा समुद्राच्या किनाऱ्यावरती पोहोचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. कचऱ्याचा काही भाग खोल समुद्रात जाईल आणि शेवटी महासागराच्या तळाशी अडकेल आणि त्यामुळे आर्क्टिक महासागरामध्ये भरपूर कचरा जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे. शास्त्रज्ञ आणि अनेक अभ्यासकांच्या मते महासागरात साचत असलेला कचरा ही बाब जगासाठी नवीन संकटाचं कारण ठरू शकते.

धक्कादायक : कोरोना काळात साचलेला कचरा, जगासाठी ठरु शकतो नव्या संकटाचं कारण
Raza Academy : "मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करते"

कोरोना काळात वापरलेलं आणि सध्या वापरात असलेले मास्क, ग्लोव्ह्जमुळे कचरा वाढला असून संशोधकांच्या टीमनं महासागरातल्या प्लास्टिकचं संख्यात्मक मॉडेल विकसित केलं आहे. संशोधकांनी नमूद केल्याप्रमाणे, कोरोना महामारीमध्ये सिंगल यूझ प्लास्टिकच्या वापरामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले आणि तसेच या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट देखील लावली जात नसल्याने या प्लास्टिक कचऱ्याचा काही भाग नद्या आणि महासागरांमध्ये गेला आहे. त्यामुळे पहिलाच नियंत्रणाबाहेर असलेल्या जागतिक प्लास्टिक समस्येत आणखी भर पडली.

दरम्यान आशियामध्ये सर्वांत जास्त कचऱ्याची निर्मिती कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून 2020 ते ऑगस्ट 2021 पर्यंतचा डेटा समाविष्ट केला असून त्यामध्ये आढळून आलं, की महासागरामध्ये जाणारा बहुतांश प्लास्टिक कचरा आशिया खंडातून येत असून, त्यामध्ये रुग्णालयातल्या कचऱ्याचं प्रमाण मोठं आहे. तसेच महासागरांमध्ये जाणाऱ्या कचऱ्यापैकी जवळपास 73 % कचरा हा आशियातील नद्यांमार्फत जात असल्याचही अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com