देशात कोरोना पुन्हा वाढतोय! गेल्या 24 तासांत 3157 नवे कोरोनाबाधित, 50 मृत्यू

देशात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे बघायला मिळत आहे
Coronavirus Cases Today, Coronavirus Latest Marathi News
Coronavirus Cases Today, Coronavirus Latest Marathi NewsSaam Tv

वृत्तसंस्था: देशात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशात सक्रीय रुग्णांची (patients) संख्या १९ हजार ५०० वर पोहोचली आहे. तर रविवारी दिवसभरामध्ये ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात ३३२४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus Cases Today)

हे देखील पाहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ५०० इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात २७२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४ कोटी २५ लाख ३८ हजार ९७६ जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ५० कोरोना (Corona) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता ५ लाख २३ हजार ८४३ झाली आहे.

देशात कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर ०.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात देशात २ लाख ९५ हजार ५८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत १८९ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी (Vaccination) देण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसभरात ४ लाख २ हजार १७० कोरोना रुग्णांना लसी देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत १८९ कोटी २३ लाख ९८ हजार ३४७ कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.

Coronavirus Cases Today, Coronavirus Latest Marathi News
शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला

मिळालेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात आतापर्यंत एकूण ५ लाख २३ हजार ८४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १ लाख ४७ हजार ८४३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह केरळमध्ये ६९ हजार ४७, कर्नाटकमध्ये ४० हजार १०१, तामिळनाडूमध्ये ३८ हजार २५, दिल्लीमध्ये २६ हजार १७५, उत्तर प्रदेशमध्ये २३ हजार ५०७ आणि पश्चिम बंगालमध्ये २१ हजार २०१ लोकांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी ७० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण इतर आजारांनी ग्रस्त झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com