
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असतानाच, आज, मंगळवारी दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २२८८ रुग्णांचे निदान झाले आहे. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील ९ दिवसांत प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा तीन हजारांच्या खाली आला आहे. (India Coronavirus Latest Update News)
सोमवारच्या तुलनेत नवीन कोरोना रुग्णांची संख्या ९१९ ने घटली आहे. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या २८.६ टक्क्यांनी कमी झाली आहे. सोमवारी कोरोनाचे (Covid 19) ३२०७ रुग्ण आढळले होते. देशात नऊ दिवसांनंतर प्रथमच नवीन रुग्णसंख्या ३ हजारांच्या खाली आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आता सक्रिय रुग्णांची संख्या १९६३७ इतकी आहे. पॉझिटिव्हिटी रेट ०.४७ टक्के इतका आहे.
गेल्या २४ तासांत २०४४ कोरोना रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, दिल्लीत सर्वाधिक १३६६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर हरयाणात ५११, केरळात ३३०, आणि उत्तर प्रदेशात २५८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात एकूण ४,२५,६३,९४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत १३,९०,९१२ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आतापर्यंत १,९०,५०,८६,७०६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
सक्रिय रुग्णांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, देशात सक्रिय रुग्णांची संख्या घटून १९६३७ इतकी झाली आहे. कालच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्या ७६६ ने कमी झाली आहे. दिल्लीत सर्वाधिक ५३६९ सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये ३०१४, हरयाणात २५६०, कर्नाटकात १९२५, उत्तर प्रदेशात १५६७ इतकी आहे.
Edited By - Nandkumar Joshi
महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाच्या ५० बातम्या (पाहा व्हिडिओ)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.