Corona | चिंताजनक ! ४० कोटी भारतीयांना अजूनही कोरोनाचा धोका
Corona | चिंताजनक ! ४० कोटी भारतीयांना अजूनही कोरोनाचा धोका SaamTv

Corona | चिंताजनक ! ४० कोटी भारतीयांना अजूनही कोरोनाचा धोका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत आज चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

दिल्ली : सध्या देशभरात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीयांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत आज चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व्हेच्या निष्कर्षांमधून हे स्पष्ट करण्यात आले आहे की देशभरात लहान बालकांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत.

मात्र, असे असून देखील सुमारे ४० कोटी भारतीय नागरिकांना अद्यापही कोरोना संसर्गाचा धोका संभवण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे कि, राष्ट्रीय सेरो सर्व्हेनुसार ६ ते १७ या वयोगटातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यांच्यात प्रतिजैविके (अँटीबॉडीज) विकसित झाले आहेत.

ICMR तर्फे चौथ्या सेरो सर्व्हेची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, सदर सर्व्हे जून ते जुलै महिन्या दरम्यान करण्यात आला होता. एकूण २८ हजार ९७५ लोकांवर करण्यात आलेल्या या सर्वेमध्ये ६ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा देखील समावेश केला गेला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, याचाच अर्थ ते कोरोना संक्रमीत झाले होते परंतु त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास जाणवलं नव्हता.

हे देखील पहा -

या सर्व्हेमधून हे देखील स्पष्ट झाले आहे कि, ६ ते ९ वर्षाच्या ५७.२ टक्के व १० ते १७ वर्षांच्या ६१. १ टक्के मुलांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. तर,१८ ते ४४ वर्षांच्या ६६.७ टक्के, ४५ ते ६० वर्षांच्या ७७.६ टक्के आणि ६० वर्षावरील ७६.७ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. या सर्वेमध्ये सहभागी ६९.२ टक्के महिला व ६५.८ टक्के पुरूषांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. शहरी भागात राहणाऱ्या ६९.६ टक्के आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ६६.७ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या.

Corona | चिंताजनक ! ४० कोटी भारतीयांना अजूनही कोरोनाचा धोका
लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकाने सुरु करू - संजय काका पाटील

या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या १२ हजार ६०७ लोकांनी लस घेतलेली नव्हती. ५ हजार ३८ जण असे होते ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता आणि २ हजार ६३१ नागरिक दोन्ही डोस घेतलेले होते. या सर्वेमधून समोर आले आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ८९.८ टक्के नागरिकांमध्ये आणि एकच डोस घेतलेल्या ८१ टक्के जणांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. तर ज्यांनी लसीचा कोणताही डॉस घेतलेला नव्हता अश्या नागरिकांपैकी ६२.३ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आदळून आल्या.

By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com