कोरोना लढ्याला बळकटी!; DCGI कडून हेटरोच्या औषधाला मान्यता

कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने टाकलं असून डीसीजीआयने कोरोनाच्या उपचारात टोसिहिजुबॅम औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.
कोरोना लढ्याला बळकटी!; DCGI कडून हेटरोच्या औषधाला मान्यता
कोरोना लढ्याला बळकटी!; DCGI कडून हेटरोच्या औषधाला मान्यताSaam Tv

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या तिसऱ्या Third Wave लाटेचा धोका वाढला आहे. असून सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली जाणे सुरु आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. लोकांमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने India Goverment टाकलं असून डीसीजीआयने कोरोनाच्या उपचारात टोसिहिजुबॅम tocilizumab औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. या औषधाचा वापर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित असलेल्या वृद्ध व्यक्तींवर Adults उपचारासाठी केला जाईल. याबाबतची माहिती औषध निर्मिती करणारी कंपनी हेटेरो ड्रग्जसने आज म्हणजेच सोमवारी दिली आहे.

हेटेरोने सोमवारी जाहीर केले की भारतातील औषध नियंत्रक जनरलने रुग्णालयात दाखल प्रौढांमध्ये कोविड -१९ च्या उपचारासाठी भारतातील त्याच्या टोसिलिझुमाबच्या आपत्कालीन वापरला मान्यता दिली आहे.

हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या लोकांना कॉर्टिकोस्टेरॉइड या ऑक्सिजनची किंवा एक्स्ट्रा कॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनची गरज आहे अशा रुग्णांना दिलं जाईल.

कोरोना लढ्याला बळकटी!; DCGI कडून हेटरोच्या औषधाला मान्यता
अकोल्यात पोळा सणाला गालबोट; तिघे गेले वाहून

हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर बी पार्थ सारधी रेड्डी यांनी औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यावर या औषधामुळे कोरोना रुग्णांना याचा फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. हैदराबादमधील Hyderabad जडरेचला येथील हेटेरोच्या बायोलॉजिक्सचे युनिट हेटेरो बायोफार्मामध्ये या औषधाची निर्मिती होणार आहे. तर सप्टेंबर September अखेरपर्यंत औषध उपलब्ध होऊ शकेल.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com