पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे; मोदींचा इशारा

या वेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे; मोदींचा इशारा
पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे; मोदींचा इशाराSaamTv

मुंबई : कोरोना Corona विषाणूची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत नाही तर तिसर्‍या लाटेचा Third Wave धोका आता वाढू लागला आहे. तसेच तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर विशेषकरून लहान मुलांची काळजी घ्यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी केली आहे.

येत्या काही दिवसांबाबत आरोग्य मंत्रालयाकडून इशारा देण्यात आला आहे. आपल्या साठी पुढील १०० ते १२५ दिवस फार महत्वाचे आहेत. या वेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच युरोप, बांगलादेश, इंडोनेशिया,अमेरिका, थायलंड आदी देशांत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आतापासून खबरदारी घेतली पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हे देखील पहा -

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, तमिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश या ६ राज्यात कोरोनाच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे. या ६ राज्यांनी आधीपासून सक्रिय होऊन तिसऱ्या लाटेची आशंका रोखण्यास पुढाकार घेतला पाहिजे. त्यात महाराष्ट्र आणि केरळमध्ये सतत रूग्ण वाढत जाणे हे चिंताजनक आहे. हे वेळीच रोखले पाहिजे. तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिल्यावरही काही राज्यांमधील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.

कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोनापासून वाचण्यासाठी टेस्ट, ट्रैक, ट्रीट व लसीकरण हीच रणनीती यापुढे राबवावी लागणार आहे. ज्या जिल्ह्यांत रूग्णवाढ अधिक आहे तेथे कडक नियम लागू करण्यावर भर द्यावे लागेल. आपण सर्वजण अशा ठिकाणी आलो आहोत की जिथे तिसर्‍या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञ वारंवार देत आहेत .

पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे; मोदींचा इशारा
पुणे-नाशिकचा प्रवास सुखद; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण

युरोप व अमेरिकेत पुन्हा रूग्णसंख्या फार वेगाने वाढत आहे त्यामुळे पंतप्रधानांनी युरोप, अमेरिका, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड आणि इतर अनेक देशांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोरोना अजून संपला नाही, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी बैठकीत केला. लॉकडाऊननंतर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि होणारी गर्दी याबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने केलेल्या कामाचे नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. ‘४ टी’ चा मंत्र योगी आदित्यनाथ सरकारने अमलात आणला. राज्यात ५ कोटी ७० लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत व दर दिवशी चाचण्यांची क्षमता राज्याने दीड लाखांपर्यंत वाढवली आहे.असेही मोदी यांनी सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com