Corona Update: काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात १८ हजारहून अधिक रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १८७३८ नवीन रुग्ण आढळले आहेत.
India corona update
India corona updateSAAM TV

नवी दिल्ली: देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १८७३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत असून, नेहमीप्रमाणेच केरळ आणि महाराष्ट्र या बाबतीत पुढे आहेत. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी नवीन प्रकरणांमध्ये किंचित घट झाली आहे. शुक्रवारी देशात १९,४०६ नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर १९,९२८ लोक बरे झाले आहेत.

शुक्रवारी, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १,३४,७९३ होती आणि सकारात्मकता दर ४.९५ टक्के नोंदवले आहे. आताच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १३४९३३ वर पोहोचली आहे. (Corona Latest Update)

India corona update
Bangladesh Hikes petrol Price: बांगलादेशात महागाईचा हाहाकार! पेट्रोलच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक केली वाढ

देशात आतापर्यंत ४.३४ कोटी रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर आतापर्यंत ५२६६८९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. आता भारतात एका दिवसात १८,७३८ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळल्यानंतर, देशातील एकूण संसर्गाच्या रुग्णांची संख्या ४,४१,४५,७३२ झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,३४,९३३ वर पोहोचली आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५,२६,६८९ झाली आहे.

India corona update
जाळपोळीच्या घटनेनंतर मणिपूरमध्ये जातीय तणाव वाढला, ५ दिवस इंटरनेट बंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी ०.३१ टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.५० टक्के आहे. गेल्या २४ तासात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत १४० ने वाढ झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com