Corona Update: जगातून कोरोना संपणार का? WHOचे प्रमुख, म्हणाले...

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते.
Corona Update
Corona UpdateSaam Tv

Corona Update: गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाने (Corona) हाहाकार माजवला होता. अनेक देश कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना महामारीला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यावर आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'कोरोना महामारीचा अंत होण्याची वेळ जवळ आल्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

सर्व देशांना या कोरोनाचा (Corona) सामना करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्याचे मी आवाहन करतो, ज्याने आतापर्यंत जगभरात ६५ लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

Corona Update
उड्डाण घेण्याआधीच एअर इंडियाच्या विमानातून अचानक निघाला धूर, नंतर जो काही उडाला गोंधळ...

WHO प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 'आम्ही कोरोना महामारीचा अंत करण्यासाठी कधीही चांगल्या वेळेत नव्हतो. अजूनही अंताच्याजवळ नाही, पण शेवट जवळ आला आहे. या संधीचा वापर करण्यासाठी जगाने पावले उचलण्याची गरज आहे. जर आपण आता या संधीचा फायदा घेतला नाही, तर अधिक धोका आहे, असंही WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले.

Corona Update
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त; किती रुपयांनी घसरला भाव? जाणून घ्या

२०१९ वर्षाच्या शेवटच्या दिवसात चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरसला सुरूवात झाली. तेव्हापासून आता WHO च्या प्रमुखांनी आशावादी विधान केले आहे. गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर नोंद केलेल्या रुग्णांची संख्या मार्च २०२० नंतरच्या सर्वात कमी झाली आहे.

कोविड-19 वरील WHO च्या ताज्या अहवालानुसार, ११ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात जगभरात नोंदलेल्या कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या २८ टक्क्यांनी घटून ३१ लाखांवर आली आहे. याआधी एक आठवडापूर्वी १२ टक्क्यांनी घसरला होता. (Corona Update)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com