Corona : कोरोना विषाणूची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तब्बल 3 वर्षांनी समोर आली धक्कादायक माहिती

तब्बल ३ वर्षांनी कोरोना विषाणू कशामुळे पसरला, त्याची माहिती समोर आली आहे.
Corona Virus
Corona VirusSaam Tv

नवी दिल्ली : जगात चीनमध्ये प्रथम कोरोनाने हाहाकार केला. कोरोनाने भारतात ३० जानेवारी रोजी शिरकाव केला. त्यानंतर भारतात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला. या कोरोना विषाणूची नेमकी उत्पत्ती कशी झाली, याबाबत कोणतीही ठोस माहिती चीनकडून आली नव्हती. त्यानंतर तब्बल ३ वर्षांनी कोरोना विषाणू कशामुळे पसरला, त्याची माहिती समोर आली आहे. हा विषाणू वटवाघूळ, उंदिर यापासून पसरला नसून रॅकून कुत्र्यापासून (Raccoon Dogs) पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांनी २०२० मध्ये चीनच्या हुनान प्रांतातील सीफूड होलसेल मार्केट आणि त्याच्या जवळील भागातून जेनेटिक डेटा फॉर्म नमुने (स्वॅब) गोळा करण्यात आले. यानंतर या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. यातील अनेक नमुन्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर प्राण्यांना घेऊन जाणारे वाहने, पिंजऱ्यांचेही नमुने गोळा करण्यात आले. इन्फ्लुएंजाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाचे गेल्या चोवीस तासात ७९६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Corona Virus
Corona Alert : भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार? तज्ज्ञांनी दिली नव्या व्हेरिएंटबद्दल धक्कादायक माहिती

तपासात आढळून आले की, अनेक नमुन्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. यात रॅकून कुत्र्यांसह इतर प्राण्यांचे साहित्य होते. मात्र, रॅकून कुत्रे (Dog) कोरोनाबाधित होते. परंतु त्यांच्यामुळे विषाणू माणसांमध्ये पसरल्याची पुष्टी मिळाली नाही. तसेच विषाणू हा रानटी जनावरांमुळे पसरतो अशीही माहिती समोर आली आहे.

Corona Virus
Jalgaon Corona Update: भुसावळात आढळला कोरोनाचा रुग्ण; सहा महिन्‍यानंतर पहिला रुग्ण

अँजेला रासमुसेन या नावाच्या विषाणूशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, बाजारात अनेक प्राणी हे विषाणूने बाधित होते. दरम्यान, चिनी (China) लोकांनी आधीच नमुन्यांची चाचणी केली होती आणि कोणत्याही प्राण्यामध्ये SARS-CoV-2 असल्याचा कोणताही पुरावा नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com