सावधान! कोरोनाची चौथी लाट आली?; देशातील रुग्णांची आकडेवारी उरात धडकी भरवणारी

चिंताजनक बाब म्हणजे यादरम्यान 47 रुग्णांचा मृत्युही झाला आहे.
India corona update
India corona updateSaam Tv

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची (Corona) संख्या सातत्याने वाढत आहे. काल परवापर्यंत 15 हजारांपर्यंत आढळून येणारी रुग्णसंख्या आता 20 हजारांच्या घरात गेली आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे मंकीपॉक्स व्हायरसचा धोकाही वाढला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे (corona new patients) 20 हजार 38 नवे रुग्ण आढलून आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे यादरम्यान 47 रुग्णांचा मृत्युही झाला आहे. (Corona Cases In India)

India corona update
धक्कादायक! पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना हृदयविकाराचा झटका

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आदल्या दिवशी म्हणजेच गुरूवारी देशात कोरोनाचे 20 हजार 139 रुग्ण आढळले होते. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला. गुरूवारच्या तुलनेनं शुक्रवारी रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली असली तरी, वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे प्रशासनाची मात्र चिंता वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण सक्रिय संख्या आता 1 लाख 39 हजार 073 इतकी झाली आहे. सध्या देशात कोरोना संक्रमणाचा दर 4.44 टक्के इतका आहे. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम जोमात सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना लसीचे 18,92,969 डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील लसीकरणाचा एकूण आकडा आता 1,99,47,34,994 वर पोहचला आहे. (Covid 19 India)

महाराष्ट्रात 2229 नवे कोरोना रुग्ण

गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाच्या 2229 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण 2594 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या 3318 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला आहे.

केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण

मागील काही दिवसांपासून परदेशात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स विषाणूने आता भारतातही शिरकाव केला आहे. भारतातील केरळ राज्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. मंकीपॉक्सचा रुग्ण आढळताच केरळमध्ये खळबळ उडाली असून आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com