कोरोनाची चौथी लाट आली? देशात २४ तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या; ४९ मृत्यू

देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला
Corona Virus latest News
Corona Virus latest NewsSaam Tv

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे (corona new patients) 20,528 नवीन रुग्ण आढळले आहेत.तर या काळात 49 जणांचा मृत्युही झाला. चिंताजनक बाब म्हणजे शनिवारच्या तुलनेत आज 500 अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या आता 1,43,449 वर पोहोचली आहे. (Corona Cases In India)

Corona Virus latest News
YES Bank ग्राहकांना मोठा झटका! बॅंकेने बदलले महत्वाचे नियम

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

शनिवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 2,382 नवीन रुग्ण आढळून आले होते. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 80,17,205 वर पोहोचली. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 1,48,023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी महाराष्ट्रात 2,853 रुग्णांनी कोरोनावर मात केली.सध्या महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15,521 आहे. राज्यात कोविड-19 मधून बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे 97.96 आणि 1.84 टक्के आहे. (Corona Cases In Maharastra)

Corona Virus latest News
Breaking: भारतात येणारं इंडिगोचं विमान थेट पाकिस्तानात पोहचलं; वाचा नेमकं काय घडलं?

कर्नाटकात 1300 हून अधिक प्रकरणे

कर्नाटकात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,347 नवीन प्रकरणे समोर आली. त्यामुळे कर्नाटकातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 39,85,376 झाली आहे. त्याचवेळी, तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 40,088 वर पोहोचली आहे. याआधी, शुक्रवारी संसर्गाची 977 प्रकरणे नोंदवली गेली आणि एका संक्रमिताचा मृत्यू झाला.

काश्मीर आणि गुजरातमध्येही कोरोनाचे रुग्ण

शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे 224 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे येथील एकूण रुग्णांची संख्या 4,56,829 झाली. या नवीन प्रकरणांमध्ये, जम्मू प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात 112-112 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहमदाबादमधून मिळालेल्या अहवालानुसार, शनिवारी गुजरातमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची 777 नवीन प्रकरणे समोर आली आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com