चिंताजनक! देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या

Coronavirus Live Update India: देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णसंख्येने (Corona Patients) तीन हजारांचा टप्पा पार केला आहे.
Corona virus
Corona virus Saam Tv

नवी दिल्ली: कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरोना संक्रमण (Corona Virus) बाबत सावध राहण्याचा इशारा काल दिला होता. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackerey) यांनीही राज्यातील जनतेला पुन्हा बंधने नको असतील, तर कोरोनाबाबत स्वयंशिस्त पाळा असे आवाहन केले होते. असं असतानाच पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने (Corona Patients) तीन हजारांचा टप्पा पार केला आहे.

Corona virus
कोरोनापासून मुलांचं संरक्षण करणार 'ही' लस; NTAGI कडून मंजुरी

गेल्या 24 तासांत देशात तब्बल 3 हजार 688 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 हजार 755 जण कोरोनामुक्त झाले, यादरम्यान 50 जणांच्या मृत्युची नोंदही करण्यात आली आहे. देशातील उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता 18 हजार 684 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (30 एप्रिल) सकाळी 8:00 पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 430,72,176 इतकी झाली आहे. यापैकी 425,333,77 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले, तर आतापर्यंत 523,803 जणांना मृत्यू झाला आहे.

दिल्लीत सर्वाधिक प्रकरणे

दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची (Delhi Coronavirus) सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहे.दिल्लीत शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1490 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत तब्बल 1,607 जणांना कोरोनाची लागण झाली, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यादरम्यान 1,246 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. सध्या दिल्लीत 5,609 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहे.

दरम्यान, शुक्रवारी(29 एप्रिल) देशात 3 हजार 377 नवे संक्रमित रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 311 अधिक रुग्ण सापडले आहेत. सध्या देशात कोरोना प्रकरणाचा सक्रिय दर 0.04 टक्के इतका आहे, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.8 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 4,96,640 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. सध्या देशात लहान मुले आणि प्रौढांना लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याचे काम सुरू आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com