Covid-19 : आता लहान मुलांना पण मिळणार कोरोना लस!

येत्या एक ते दोन आठवड्यात अठरा वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचं (Covaxin) लसीकरण सुरु होणार आहे.
Covid-19 : आता लहान मुलांना पण मिळणार कोरोना लस!
Covaxin SaamTv

नागपूर : संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin) हि कोरोना प्रतिबंधक लस आता २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. लहान मुलांसाठी कोविड -१९ संबंधीच्या विषय तज्ज्ञ समितीने डीसीजीआय (DCGI) कडे भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीच्या इमर्जन्सी वापरासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्याला आता परवानगी मिळाली आहे. आयसीएमआर (ICMR) आणि भारत बायोटेक यांच्या माध्यमातून या लसींची निर्मिती करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

हि लस पूर्णतः स्वदेशी बनावटीची लस आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन आठवड्यात अठरा वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचं लसीकरण सुरु होणार आहे. कोरोना विरुद्धच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोव्हॅक्सिन जवळपास ७८% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. लहान मुलांसाठी लसीकरण उपलब्ध होणार असून हे मोठे यश असल्याचे मत नागपूरात लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करणारे डॉ.वसंत खळतकर यांनी व्यक्त केले आहे.

Covaxin
Nashik : बळजबरीने लॉज वर नेऊन तरुणीवर अत्याचार! पहा Video

पुढच्या एक ते दोन आठवड्यात प्रत्यक्ष लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल, असा आशावादही डॉ. खडतकर यांनी व्यक्त केलाय. केंद्र सरकारकडून लवकरच या लसीकरणा बाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत, त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. लहान मुलांना प्रौढांप्रमाणेच लसीचे दोन डोस देण्यात येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा लहान मुलांवर कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com