Corona Study : कोरोना झालेल्या व्यक्तीला ९० दिवसांनी पुन्हा संसर्ग, पण...

देशभरात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत असतानाच, एका अभ्यासातून चिंतेत भर पाडणारी माहिती समोर आली आहे.
Corona Study : कोरोना झालेल्या व्यक्तीला ९० दिवसांनी पुन्हा संसर्ग, पण...
Corona in India, Coronavirus Latest Marathi News Updates, Corona Study, Corona research study, SAAM TV

नवी दिल्ली: देशभरात उष्णतेची लाट आलेली असतानाच, पुन्हा कोरोनाचं संकटही घोंघावत आहे. कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या वर आढळून येत आहे. देशभरात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्याही तीन हजारांच्या आसपास आहे. त्याचवेळी एका अभ्यासातून चिंतेत भर पडणारी माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे, त्यांना ९० दिवसांच्या आत पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (CDCP) या संस्थेनं हा अहवाल दिला आहे. (Coronavirus Latest Marathi News Updates)

Corona in India, Coronavirus Latest Marathi News Updates, Corona Study, Corona research study,
देशात कोरोना पुन्हा वाढतोय! गेल्या 24 तासांत 3157 नवे कोरोनाबाधित, 50 मृत्यू

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेने अलीकडेच चार राज्यांतील दहा रुग्णांची अभ्यासासाठी निवड केली होती. ज्यांना ९० दिवसांच्या आत डेल्टा या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा संसर्ग झालेला होता. या रुग्णांपैकी एका रुग्णाने सहा ते दहा आठवड्यांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस घेतलेले होते. तर, दोन रुग्णांनी लशीचा एक डोस घेतलेला होता. उर्वरित सात रुग्णांपैकी काही जण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा एकही डोस घेतला नव्हता. पहिल्यांदा कोरोनाबाधित झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचा मधला कालावधी हा २३ ते ८७ दिवस असल्याचं अभ्यासातून समोर आले आहे. अँटिजन चाचण्या घरीच करण्याचे प्रमाण वाढलेले आहे, अशी माहितीही अभ्यासातून उघड झाली आहे.

'ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नाही'

ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नाही. एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्हेरियंट रुग्णामध्ये आढळून येऊ शकतात, अशी शक्यताही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन केले तरच या महामारीपासून बचाव होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Corona in India, Coronavirus Latest Marathi News Updates, Corona Study, Corona research study,
सावधान ! या शहरात पुन्हा वाढू लागली कोरोनाची संख्या, 31 मे पर्यंत कलम 144 लागू

कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

देशावरील कोरोनाचं (Covid 19) संकट अद्याप दूर झालेले नाही. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं आज, सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ५०० वर पोहोचली आहे. तर रविवारी दिवसभरामध्ये ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात ३३२४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर ४० जणांचा मृत्यू झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.