Coronavirus Alert : कोविडचा धोका वाढला, महाराष्ट्रासह सर्व राज्यांना केंद्राचा 'इशारा'

Covid Cases Update in India : कोविडचा धोका वाढला, महाराष्ट्रासह सर्व राज्यांना केंद्राचा 'इशारा'
Coronavirus Cases in India
Coronavirus Cases in IndiaSaam Tv

Covid Cases Update in India : भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणांत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच देशभरात चिंतेचे वातावरण आहे. अशातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना महत्वाचा इशारा दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात आठ राज्यांना पत्र लिहिलं आहे. यात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. कोरोना परिस्थितीवर अधिक ठेवण्यासंदर्भात त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

Coronavirus Cases in India
Wipro Enter in Food Package Market: अंबानी-अदानी आणि टाटाला मिळणार टक्कर, पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये 'विप्रो'ची एंट्री

कोरोना रुग्णाची संख्या १२ हजारांवर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी रुग्णांची संख्या १२ हजारांहून अधिक होती.

Coronavirus Cases in India
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सकाळी कोरोनाच्या (Corona) सक्रिय रुग्णांमध्ये घट पाहायला मिळाली. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६६ हजार १७० इतकी झाली आहे. या सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Corona New Varient) एन्ट्री केली आहे. या व्हेरिएंटचा सामाना करण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी राज्यभरातील सर्व सरकारी महाविद्यालयाचे डीन आणि आयुक्तांची बैठक पार पडली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com