Corona New Variant : महाराष्ट्रासह ११ राज्यांत पसरतोय करोनाचा नवा व्हेरियंट; तज्ज्ञ म्हणाले, श्वसनाचे विकार...

Omicron XBB.1.16 Latest Update : देशात करोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासांत या घातक विषाणूचे ३०१६ नवे रुग्ण आढळले आहेत.
Covid 19 New Variant Omicron XBB.1.16 Latest Update
Covid 19 New Variant Omicron XBB.1.16 Latest UpdateSAAM TV

Covid 19 New Variant Omicron XBB.1.16 Latest Update : देशात करोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासांत या घातक विषाणूचे ३०१६ नवे रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक म्हणजे या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यूही होत आहे. महाराष्ट्रात करोनाने तीन आणि दिल्लीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोनाच्या नवीन ओमिक्रॉन सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. ओमिक्रॉन एक्सबीबी.१.१६ व्हेरियंटचा फैलाव वेगाने होत आहे. संसर्ग झालेल्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. (Covid 19 In India)

Covid 19 New Variant Omicron XBB.1.16 Latest Update
Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढणार, पालिका प्रशासनाचा इशारा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील ११ राज्यांत XBB.1.16 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या ६०० हून अधिक झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात या व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक आहेत.

करोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याने मृत्यूही होत आहेत. तामिळनाडूत या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यामुळे एका २७ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरियंटने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सीक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. (Corona Latest Update)

Covid 19 New Variant Omicron XBB.1.16 Latest Update
Maharashtra Corona Update: टेन्शन वाढलं; राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ४०० पार, तिघांचा मृत्यू

लोकांनी अधिक सतर्क राहावे

नवी दिल्लीतील एम्समधील क्रिटिकल केअर विभागाचे प्राध्यापक डॉ. युद्धवीर सिंह यांनी सांगितले की, कोविड १९ चे रुग्ण वाढण्यामागील कारण हा नवा व्हेरियंट असू शकतो. ज्या नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे ते बाधित होत आहेत.

लोक फ्लूची लक्षणे दिसून आल्यास रुग्णालयांत जात आहेत. तिथे त्यांची कोविड १९ चाचणीही केली जात आहे. चाचणीत करोना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अशात लोकांनी अधिक सतर्क राहायला हवे. नागरिकांनी मास्क लावावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्लाही डॉ. सिंह यांनी यावेळी दिला.

अस्थमा आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांनी निष्काळजीपणा करू नये

दिल्लीतील डॉ. अजय कुमार यांनी सांगितले की, ''श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांनी सध्याच्या घडीला अधिक सतर्कता बाळगावी. कोविडच्या नव्या व्हेरियंटमुळे त्रास वाढू शकतो.''

आपल्या आजारावरील औषधं वेळीच घ्यावीत. तसेच कोणत्याही बाधित रुग्णाच्या संपर्कात येऊ नये. एखाद्याला सर्दी-खोकला किंवा सौम्य ताप असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. कोविडची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही आवाहन त्यांनी केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com