Covovax लस 12 वर्षांवरील सर्वांसाठीच, अदर पुनावालांचे स्पष्टीकरण

कोवोव्हॅक्स (Novavax), आता भारतात मुलांसाठी उपलब्ध आहे.
Adar Poonawalla Latest Marathi News, Covovax latest Marathi news
Adar Poonawalla Latest Marathi News, Covovax latest Marathi newsSaam TV

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute Of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बुधवारी स्पष्ट केले की, कोविड-19 (Covid-19) ची कोवोव्हॅक्स लस आता 12 वर्षांवरील सर्वांना उपलब्ध होणार आहे. पूनावाला यांनी ट्विट केले, "तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी विचारले की कोवोव्हॅक्स लस प्रौढांसाठी उपलब्ध आहे का. तर त्याचे उत्तर होय आहे, ती लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे." पूनावाला यांनी दोन दिवसांपुर्वीच सांगितले होते की कोवोव्हॅक्स भारतातील मुलांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर ही लस फक्त लहान मुलांसाठीच आहे की प्रोढांसाठीही आहे असे प्रश्न समोर येऊ लागले होते त्याचे उत्तर पुनावाला यांनी दिले आहे. (Covovax Vaccine Latest Marathi News)

कोवोव्हॅक्स (Novavax), आता भारतात मुलांसाठी उपलब्ध आहे. भारतात उत्पादित केलेली ही एकमेव लस आहे जी युरोपातही विकली जाते आणि तिची परिणामकारकता 90 टक्के आहे. ''आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणखी एक लस उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी हे सुसंगत आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या Covovax लसीला 12-17 वयोगटासाठी मंजूर दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, सरकारने कोवोव्हॅक्सला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.

दरम्यान, ट्वीटरवरती अनेकांनी तक्रार केली की Covovax पर्याय CoWIN अॅपवर 18+ वयोगटासाठी उपलब्ध नाही. "18 आणि त्यावरील टॅब निवडल्यास कोविन अॅप Covovax लसीचा पर्याय दाखवत नाही. आशा आहे की त्याकडे लक्ष दिले जाईल," असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.

दुसर्‍या वापरकर्त्याने CoWIN अॅपचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि म्हणाला, "हे पहा, जेव्हा आम्ही CoWIN अॅपमध्ये 18 आणि त्यावरील पर्याय निवडतो, तेव्हा आपोआप कोवोव्हॅक्स पर्याय निघून जातो. तिथे फक्त 4 पर्याय हायलाइट केले जातात जसे की Covishield, Covaxin, Sputnik, ZyCov-D."

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com