Tamil Nadu News: मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात, क्रेन उलटल्याने चौघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

या अपघातात 9 जण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Tamil Nadu Accident
Tamil Nadu AccidentTwitter/@ANI

Accident News : तामिळनाडूच्या अरक्कोनम शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रानीकोट जिल्ह्यातील अरक्कोनम येथील नेमिलीच्या मंडिअम्मन मंदिरात उत्सवादरम्यान क्रेन उलटून चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 9 जण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tamil Nadu Accident
World's Top 10 Rich : जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर, अदानी कोणत्या स्थानावर?

मिळालेल्या माहितीनुसार, रानीकोट जिल्ह्यातील अरक्कोनम भागात असलेल्या नेमिलीच्या मंडिअम्मन मंदिरात परिसरातील अनेक गावातील लोक जमले होते. मायलेरू नावाच्या सणाबद्दल खूप उत्साह होता आणि मंडिअम्मन मंदिरात लोकांची मोठी गर्दी झाली होती.

प्रथेनुसार लोक क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. त्यानुसार मुथू कुमार, बूपलन आणि जोठी बाबू हे देखील क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, अचानक तिघेही ज्या क्रेनला पुष्पहार घालण्यासाठी लटकले होते, ती क्रेन असंतुलित झाली.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत हा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. क्रेन उलटताच घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर 9 जण या अपघातात जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. या अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com