उड्डाण घेण्याआधीच एअर इंडियाच्या विमानातून अचानक निघाला धूर, नंतर जो काही उडाला गोंधळ...

मस्कतहून कोचीनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामधून अचानक धूर दिसू लागला.
AIR-INDIA
AIR-INDIASaam Tv

नवी दिल्ली : मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज बुधवारी मस्कतहून कोचीनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानामधून अचानक धूर दिसू लागला. त्यामुळे मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बुधवारी सकाळी विमान कोचीसाठी रवाना होणार होते, मात्र त्यापूर्वीच विमानातून धूर येऊ लागला.

AIR-INDIA
गुजरातमध्ये भीषण अपघात; लिफ्ट तुटल्याने ८ कामगारांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे (Air India) विमान क्रमांक IX-442, VT-AXZ बुधवारी मस्कतहून कोचीसाठी रवाना होणार होते. यावेळी विमानातून अचानक धूर निघू लागला, त्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी घाईघाईने विमानातील १४४ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यात आले. या घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

AIR-INDIA
King Cobra Video : कोब्रासोबत मस्ती तरुणाला पडली भारी; शेपटी धरताच घडलं असं काही...

मिळालेल्या माहितीनुसार, विनानाच्या इंजिन ऑइलमुळे आग लागली असावी आणि त्यातून धूर निघत असावा. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. एअर इंडियाचे विमान क्रमांक IX-442, VT-AXZ बुधवारी सकाळी 11:30 वाजता मस्कतहून कोचीला उड्डाण करणार होते, पण त्यापूर्वीच धूर दिसू लागल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com