
Crime News : माफिया डॉन अतीक अहमद सध्या प्रयागराज येथील नैनी जेलमध्ये आहे. आज उमेश पाल अपहरण प्रकरणी एमपी एमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. अशात आतीक आणि त्याच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी समोर येतायत. गुन्हेगारीसह राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या आतीकच्या संपूर्ण कुटुंबावर विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीचा रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या अतीक आणि त्याच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. (Atique Ahmed Family)
सर्वात आधी अतीक अहमदवर असलेल्या गुन्ह्यांबद्दल बोलायचे झाल्यास साल २०१९ मध्ये त्याच्यावर जवळपास ५९ गुन्हे दाखल होते. यामध्ये ८ खूनाच्या घटना होत्या. अतीकचा भाऊ देखील खून, चोरी, अपहरण अशा कामांमध्ये पुढे आहे. त्याच्यावर ५३ खटले सुरू आहेत. तसेत त्याच्या पत्नीवर देखील ४ गुन्हे दाखल आहेत. मुलगा मोहम्मद देखील या वाईट दुनियेपासून दूर नाही. त्याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्याने केलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी केला खून
अतीक अहमदने साल १९७९ पासूनच गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. तो १७ वर्षांचा असताना आपल्या कुटुंबासह अलाहाबाद येथे राहत होता. यावेळी शाळेत नापास झाल्याने त्याने पुढील शिक्षणाकडे देखील पाठ फिरवली. तसेत जास्त पैसे मिळण्यासाठी तो चोरी, अपहरण असे गुन्हे करू लागला. पुढे त्याने मोठ मोठे गुन्हे करण्यास सुरूवात केली आणि एका व्यक्तीचा त्याने खून केला. त्यामुळे गावात अतीकची दहशत निर्माण झाली.
कुटुंबातील चार जण जेलमध्ये बंद
अतीक अहमद आणि त्याची पत्नी शाइस्ता या दोघांना एकून पाच मुलं आहेत. मोहम्मद उमर, मोहम्मद अली, मोहम्मद असद, मोहम्मद अहजम और मोहम्मद आबाम अशी त्याच्या मुलांची नावे असून यातील चौघांवर गुन्हे दाखल आहेत.
अतीकला आधी साबरमती जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या जेलमध्ये या आधी त्याच्या भावाने शिक्षा भोगली आहे. तसेच आता अतीक नैनी जेलमध्ये आहे. येथे देखील त्याचा लहान मुलगा जेलमध्ये बंद आहे. अन्य दोन मुंलाना देखील वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.