गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त: एटीएसची कारवाई

द्वारका मधील नवाद्रा या गावात एका घरामधून २४ किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची बाजारात किंमत १२० कोटी रुपये इतकी आहे
गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त: एटीएसची कारवाई
गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त: एटीएसची कारवाई Saam Tv

वृत्तसंस्था : गुजरात मधील द्वारका या ठिकाणी एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. द्वारका मधील नवाद्रा या गावात एका घरामधून २४ किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची बाजारात किंमत १२० कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी एटीएसकडून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे देखील पहा-

काही दिवसाअगोदर गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एका गावामधून एटीएसने १२० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याचे बाजारमूल्य जवळपास ६०० कोटी रुपये इतके होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या हाती आज मोठ्या प्रमाणात यश लागले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत जात असल्याचा दावा एटीएसने केला आहे.

गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त: एटीएसची कारवाई
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका

पंजाबच्या फरिदाकोट तुरुंगामध्ये असलेला भूषण शर्मा उर्फ भोला शूटर तुरुंगामधूनच अमली पदार्थांचे रॅकेट चालवत असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवलखी बंदराजवळ असलेल्या जिनजुदा गावाजवळ १२० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com