जमावावर अंदाधुंद गोळीबार, सहा जणांचा मृत्यू

इंग्लंडमध्ये जमावावर झालेल्या अंदाधुंद गोळीबार मध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
जमावावर अंदाधुंद गोळीबार, सहा जणांचा मृत्यू
जमावावर अंदाधुंद गोळीबार, सहा जणांचा मृत्यूSaam Tv

वृत्तसंस्था : इंग्लंडमध्ये England जमावावर झालेल्या अंदाधुंद गोळीबार मध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ लहान मुलाचा देखील समावेश आहे. दक्षिण पश्चिम इंग्लंड मधील प्लायमाउथ Plymouth शहरामध्ये काही अज्ञात लोकांनी जमावावर अचानक अंदाधुंद गोळीबार Firing केले आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ माजलेला होता. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. रॉयटर्सने याबाबत महत्वाचे वृत्त दिले आहे.

हे देखील पहा-

प्लायमाउथ शहरामध्ये जमावावर झालेली घटना धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ब्रिटनच्या Britain गृह सचिव प्रीति पटेल यांनी यावेळी दिली आहे. प्रीति पटेल यांनी ट्विटरवर Twitter या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांमध्ये २ महिला तर ३ पुरुष आणि १ लहान मुलाचा समावेश आहे. गोळी लागल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात hospital दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

जमावावर अंदाधुंद गोळीबार, सहा जणांचा मृत्यू
जमिनीच्‍या वादातून गोळीबार; एक जण जखमी

जमावावर अंदाधुंद गोळीबार प्रकरणात ६ जणांचा मृत्यू झाल्याने या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे प्लायमाउथ पोलिसांनी सांगितले आहे. प्लायमाउथ सटन आणि डेवोनपोर्टचे खासदार ल्यूक पोलार्ड म्हणाले की, ही घटना भयानक आणि धक्कादायक आहे. मृत्यू पावलेल्यां मध्ये लहान मुलाचा समावेश असल्याचे समजल्यानंतर खूप दु:ख झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com