Online Fraud News: 'एकावर एक फ्री' थाळी पडली महागात! एक क्लिक अन् थेट ९०,००० रुपयांचा चुना

Free Thali Scam in Delhi: एक थाळी विकत घ्या आणि दुसरी मोफत मिळवा अशी ऑफर फेसबुकवर दिली होती; जी चांगलीच महागात पडली आहे....
Online Fraud News
Online Fraud NewsSaamtv

Delhi Women Online Fraud: सध्या अनेकजण सर्रास ऑनलाईन जेवण मागवत असतात. मात्र दिल्लीमधील एका महिलेला एकावर एक डीश मिळवण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. या महिलेची एकावरएक थाळी फ्री देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत महिलेने सायबर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. (Online Fraud News)

Online Fraud News
Guyana school fire: बापरे! शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्याचा राग; मुलीने अख्ख्या शाळेलाच लावली आग, २० जणांचा होरपळून मृत्यू

काय आहे प्रकरण?

याबाबत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सविता शर्मा (वय, ४०) नावाच्या महिलेला तिच्या एका नातेवाईकाने तिला एक थाळी विकत घ्या आणि दुसरी मोफत मिळवा अशी ऑफर फेसबुकवर दिली होती. महिलेने 27 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित वेबसाइट उघडली आणि या ऑफरबद्दल जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल केला. (Delhi News)

या कॉलरने एक लिंक शेअर केली आणि मला ऑफरचा लाभ घेण्यासाठी एक ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. या सायबर चोरट्याने ॲप उघडण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डही पाठवला. तसेच ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम या ॲपवर नोंदणी करावी लागेल, असेही संबंधित महिलेला सांगितले. (Latest Marathi News)

Online Fraud News
Bhandara News : बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर फडशा; मानेगाव बाजार, झबाडाचे शेतकरी चिंतेत

९०,००० रुपयांची फसवणूक...

मात्र सायबर चोरट्याने सांगितल्या प्रमाणे महिलेने लिंकवर क्लिक केले आणि ॲप डाउनलोड झाला. तसेच यूजर आयडी आणि पासवर्ड टाकला. मात्र सर्व करत असतानाच माझा फोन हॅक झाला. तेव्हा खात्यातून 40,000 रुपये कट झाल्याचा मेसेज आला. तसेच या महिलेने सांगितले की काही सेकंदांनंतर त्यांना आणखी 50,000 रुपये काढले गेल्याचेही समजले. ज्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले..

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा फसवणुकीपासून लोकांनी सावध राहण्याचे सायबर पोलिसांनी केले सांगितले. अशा अनेक फेक लिंक फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत राहतात. अनेक वेळा त्या लिंकवर क्लिक करताच पैसेही कापले जातात, त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलिस म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com