'आसानी' ने धारण केलं रौद्र रूप, 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पुढील 24 तासांत असनी चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'आसानी' ने धारण केलं रौद्र रूप, 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
CycloneSaam Tv

आसानी चक्रीवादळ अलर्ट: पुढील 24 तासांत असनी चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हे वादळ येत्या 6 तासांत त्याचे गंभीर परिणाम दाखवेल. आसनी चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे वळण्याची आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरात उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील पाहा-

सध्याची हे चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून 940 किमी आणि ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याची माहिती समोर आली आहे. असनी चक्रीवादळ हे 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बंगालमध्ये 'हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. गेल्या 6 तासात हे वादळ 14 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेकडे सरकत आहे. त्याचे तीव्र चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आसनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Cyclone
पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायर तुटल्याने खोळंबा

आसानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या किनारपट्टी परिसरात चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड आणि नेव्ही अलर्टवर आहेत. जिल्ह्यांच्या प्रत्येक भागात तसेच मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. यासोबतच 5 आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.