PAN-Aadhaar Link पुढच्या वर्षापर्यंत करु शकता पण आता द्यावे लागणार एवढे पैसे

आयकर विभागाने PAN-Aadhaar Link करण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. पण आता यासाठी तुम्हाला पैसे मोजाले लागणार आहेत.
PAN-Aadhaar Link
PAN-Aadhaar LinkSaam Tv

जर तुम्ही आतापर्यंत तुमचे पॅन कार्ड (Pan Card) आधार कार्डशी (Adhar Card) लिंक केले नसेल तर तुम्हाला आता लिंक करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. लिंक करण्यासाठी आयकर विभागाने मुदत वाढवून दिली आहे. पण यासाठी पैसे आकारले आहेत.

आयकर (Income Tax) विभागासाठी धोरण तयार करणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदत वाढवली आहे. ही मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे.

PAN-Aadhaar Link
Ration Card आधारला लिंक करण्याची मुदत वाढवली; देशभरात कुठेही मिळणार रेशन

सीबीडीटीने बुधवारी संध्याकाळी उशीरा याबाबत अधिसूचना जारी केली आहे. करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत (Adhar Card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख चौथ्यांदा वाढवली आहे. अस या अधिसूचनेत म्हटलं आहे.

पॅन कार्ड पूर्वीसारखे वापरु शकता

अजुनही काहींनी पॅन कार्ड (Pan Card) आधार कार्डशी (Adhar Card) लिंक केलेले नाही, त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत कोणतीही समस्या येणार नाही. त्यांना त्यावरुन आयकर भरण्यापासून ते परतावा मिळण्यापर्यंत कार्ड पूर्वीसारखेच वापरु शकतात.

पॅन कार्ड (Pan Card) आधार कार्डशी (Adhar Card) लिंक करण्यासाठी करदात्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते. पण आता ही 'मोफत सेवा' बंद करण्यात आली आहे. जर करदात्याने 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान पॅन-आधार लिंक केले तर त्याला 500 रुपये आणि त्यानंतर 1,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.

Edited By- Santosh kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com