
मुंबई: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या जागी एका ड्युप्लिकेटचा म्हणजे त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या एका बहुरुप्याचा वापर करण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा ब्रिटनच्या एमआय 6 (MI6) या गुप्तचर संस्थेने केला आहे. पुतीन यांचा गंभीर आजाराने कधीच मृत्यू (Death) झाला आहे, पण सत्ता टिकवण्यासाठी त्यांचा मृत्यू झाल्याचं लपवण्यात येत असल्याचं ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेनं म्हटलं आहे. याबाबत रशियाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापतरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही व्लादिमीर पुतीन यांच्या मृत्यूची ही बातमी खरी की खोटी यावरुन जगभरात संभ्रम आहे. या बातमीनं जगभरात खळबळ माजली आहे. (Vladimir Putin Death News)
हे देखील पाहा -
पुतीन यांना रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांचं वय ६९ एवढं आहे. त्यामुळे आजारपणानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेनं म्हटलं आहे. एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेननही रशियाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे रशियाबद्दल जगभरात तीव्र नाराजी आहे. अशात पुतीन यांच्या मृत्यूच्या बातमीने युक्रेनच्या युद्धावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे रशियाच्या राजकारणावर असलेली पुतीन समर्थकांची पकड सैल होऊन सत्ता कमकुवत होऊ शकतो असा धाक पुतीन समर्थकांना आहे, त्यामुळेच त्यांनी पुतीन यांच्या मृत्यूची बातमी दडवून ठेवली आहे असा दावा ब्रिटनच्या MI6 या गुप्तचर संस्थेने केला आहे.
त्याचप्रमाणे पुतीन शेवटचे माध्यमांसमोर दिसले तो व्हिडीओ आधीच रेकॉर्ड केलेला जुना व्हिडिओ असू शकतो असाही दावा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने केला आहे. स्वतः पुतीन यांनीच ते आजारी पडले तेव्हा आपल्या बहुरुप्याला ड्युप्लिकेटला नियुक्त केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व बातम्यांवर रशियन सरकारकडून सध्यातरी अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे खरं काय ते समोर यायला आणखी काळ लागू शकतो.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.