नशीब असावं तर असं! लाखोंचं होतं कर्ज, घर विक्रीच्या दोन तास आधी लागली १ कोटींची लॉटरी!

पेंटर मोहम्मद बावा यांच्यावर ५० लाखांच्या कर्जासाठी स्वत:चे घर विकणार होते.
Keral Lottery
Keral LotterySaam Tv

नवी दिल्ली : एका व्यक्तीच्या अंगावर लाखोंचे कर्ज होते. हे कर्ज (Loan) फेडण्यासाठी तो व्यक्ती स्वत:चे घर विकणार होता, घराच्या विक्रीची तयारीही सुरु होती. हे घर खरेदी करणाऱ्याने टोकनही घेतले होते. पण तेवढ्यात काही तास अगोदर त्या व्यक्तीला १ कोटींची लॉटरी लागल्याची बातमी आली. तुम्हाला आता ही एखादी काल्पनिक गोष्ट वाटेल पण ही गोष्ट नाही तर खरी घडलेली घटना आहे.

ही घटना केरळ (Keral) मधील मंजेश्वर भागातील आहे. ५० वर्षांचे मोहम्मद बावा हे चित्रकार आहेत. कर्जामुळे बावा आपले घर विकणार होते, पण घर विकण्याच्या काही तासांपूर्वी त्यांना १ कोटींची लॉटरी लागल्याची माहिती समोर आली आहे.

Keral Lottery
मोदी सरकारचा मोठा निर्णय! बीएसएनएलसाठी १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी

मोहम्मद बावा यांनी आपली एकमेव मालमत्ता विकून भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला होता. बावा आणि त्यांची पत्नी अमिना यांना पाच मुले आहेत. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. दोन मोठ्या मुलींचे लग्न झाले असून दोन मुली शिक्षण घेतात. त्यांचा २२ वर्षांचा मुलगा निजामुद्दीन याला तीन आठवड्यांपूर्वी कतारमधील एका इलेक्ट्रिकल दुकानात सेल्समनची नोकरी मिळाली आहे, अशी माहिती मोहम्मद बावा यांनी दिली.

मुलींच्या लग्नानंतर आणि घराच्या बांधकामानंतर बावा कर्जबाजारी (Loan) झाले होते. त्यांच्यावर बँका आणि नातेवाईकांचे सुमारे ५० लाख रुपयांचे कर्ज होते आणि मुलगा निजामुद्दीनला कतारला पाठवण्यासाठी त्यांनी पैसेही घेतले होते, त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला होता.

Keral Lottery
Pune News : सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी; पुण्यात युवक काँग्रेसने रेल्वे अडवली

गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबातील सदस्य कर्जामुळे (Loan) तणावाखाली होते. उत्पन्न खूपच कमी असल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. कर्ज फेडण्यासाठी मोहम्मद बावा आपले २ हजार चौरस फुटांचे घर ४० लाख रुपयांना विकून भाड्याच्या घरात राहण्याच्या तयारीत होते. त्यांचे घर आठ महिन्यांपूर्वीच बांधले होते. त्यांनी विकण्याची तयारीही सुरू केली होती.

मोहम्मद बावा यांनी घरी विकण्यासाठी अॅडव्हान्समध्ये टोकण घेणार होते. या संदर्भातील सर्व तयारीही झाली होती. पण टोकण घेण्याच्या काही तासांपूर्वी त्यांच्या कानावर १ कोटींची लॉटरी लागल्याची बातमी पडली.

रविवारी २४ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बावा यांचे कुटुंब त्यांच्या घराच्या खरेदीदाराची वाट पाहत असताना बावा बाहेर आले आणि बाजारात गेले. केरळ सरकारच्या फिफ्टी-फिफ्टी लॉटरीची चार तिकिटे त्यांनी खरेदी केली. त्या दिवशी दुपारी ३ वाजता चिठ्ठी काढण्यात आली आणि बावांना समजले की त्यांना लॉटरी लागली आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी घर विकण्यास नकार दिला. त्यांना १ कोटींच्या लॉटरीतून कर वजा केल्यावर बावांना सुमारे ६३ लाख रुपये मिळणार आहेत. यातून ते आपले कर्ज (Loan) फेडणार असल्याचे सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com