देशसेवा करण्याची सुवर्णसंधी; तरुणांनो 'या' योजनेतून करा स्वप्न साकार

सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ (Agnipath Scheme) योजनेतून साकार होणार आहे. अग्निपथमध्ये निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे तिन्ही सशस्त्र दलांत देशसेवेची संधी मिळणार आहे.
देशसेवा करण्याची सुवर्णसंधी; तरुणांनो 'या' योजनेतून करा स्वप्न साकार
ArmySaam Tv

प्राची कुलकर्णी

पुणे : सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ (Agnipath Scheme) योजनेतून साकार होणार आहे. अग्निपथमध्ये निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे तिन्ही सशस्त्र दलांत देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतीय लष्कर (Army) शारीरिकदृष्ट्या बळकट होणार असून, जवानांचे सरासरी वय ३२ वरून २६ होणार आहे’ असा विश्वास लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी व्यक्त केला. (Agnipath Scheme News In Marathi )

Army
गॅस कनेक्शन घेणे झाले महाग! जाणून घ्या किती रुपये लागणार

साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. भरती होणाऱ्या तरुणांपैकी २५ टक्के तरुणांना चार वर्षांचा सेवा कालावधी संपल्यानंतर सेवेत कायम केले जाणार आहे. तसेच यापुढे लष्कराची भरती प्रक्रिया आता ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातूनच होणार आहे, वालिया यांनी सांगितले. ‘अग्निपथ’ योजना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी तिन्ही संरक्षण दलप्रमुखांच्या उपस्थितीत जाहीर केली. या योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल वालिया बोलत होते.

Army
CNG | CNG वाहन चालकांना VIP सुविधा मिळणार, केवळ एका काॅलवर CNG पंप तुमच्या दारात...

ब्रिगेडियर पंकज नंदा यांनी ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया आणि सेवा पॅकेजची माहिती दिली. येत्या ९० दिवसांत अग्निविरांची पहिली तुकडी लष्करात भरती होईल. त्यानंतर त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.

या भरतीत उमेदवारांची निवड राष्ट्रीय स्तरावर होईल. यासाठी सहा महिन्यांची ट्रेनिंग होईल. यानंतर साडेतीन वर्ष सेवा द्यावी लागेल. भरती होणाऱ्या तरुणांपैकी २५ टक्के तरुणांना चार वर्षांचा सेवा संपल्यानंतर सेवेत कायम केले जाईल. तसेच सेवा करताना शहीद झाल्यावर कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे .तसेच अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com