Delhi: 5 मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकल्याची भीती!

दिल्लीतील सबजी मंडी परिसरात आज सोमवारी चार मजली इमारत कोसळली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती आहे.
Delhi: 5 मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकल्याची भीती!
Delhi: 5 मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकल्याची भीती!Twitter/@ANI

दिल्ली : दिल्लीतील सबजी मंडी परिसरात आज सोमवारी चार मजली इमारत कोसळली Building Collapsed in Delhi आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती आहे. तर स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत बांधकाम सुरू होते. इमारत कोसळली तेव्हा तेथे मजूर काम करत होते.

दिल्ली अग्निशमन सेवांचे संचालक अतुल गर्ग यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती सांगितले की, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या अपघातस्थळी दाखल झाल्या आहेत. घटनाठाळाच्या ठिकाणी अरुंद गल्ल्यांमुळे अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यात अडचण येत आहे. तर अग्निशमन दलाने माहिती दिली बचाव करण्यात आलेल्या 3 जनांपैकी 2 लहान मुले आहेत.

याबद्दल सुधारित माहिती अशी की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बचावकार्य अद्याप सुरू आहे.

"स्थानिक पोलीस, MCD, NDRF ची टीम बचाव कार्य करण्यासाठी आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एका व्यक्तीची सुटका करण्यात आली. त्याला डोक्याला दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले," NS Bundela, संयुक्त सीपी, सेंट्रल रेंज, दिल्ली, म्हणाले.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com